कोपरगाव तालुका
..या तालुक्यात घराचे पत्रे उडून ५० हजारांचे नुकसान
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात काल सायंकाळी सहाच्या सुमारास अवकाळी पावसाने कहर केला असून शेतकऱ्यांची गहू,हरभरा,मका,ज्वारी.या रब्बी पिकांबरोबरच द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले असले तरी अद्याप अधिकृत नुकसान फक्त चांदगव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी शंकर कारभारी आव्हाड यांच्या घराचे पत्रे उडून पन्नास हजारांचे नुकसान झाल्याची अधिकृत माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.कोरोना विषाणूने आधीच कुक्कुट पालकांचे कंबरडे मोडले असताना हि दुसरी नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांवर कोसळली आहे.
कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा भावाचा बोऱ्या उडाला असतानाच हि नवी अवकाळी पावसाची आपत्ती येऊन कोसळली आहे.या बाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चांदगव्हाण ग्रामपंचायत हद्दीत असलेले शेतकरी शंकर कारभारी आव्हाड यांच्या घराचे पत्रे उडून त्यांचा प्रपंच उघड्यावर आला असल्याची माहिती दिली आहे.
हवामान खात्याने आगामी तीन दिवस पाऊस सांगितला असून या अवकाळी पावसाने मोठे नुकसान होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.देशभरात आधीच कोरोना या विषाणूने हाहाकार उदावलेला असल्याने शेतकऱ्यांचा शेतीमालाच्या भावाचा बोऱ्या उडाला असतानाच हि नवी अवकाळी पावसाची आपत्ती येऊन कोसळली आहे.या बाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चांदगव्हाण ग्रामपंचायत हद्दीत असलेले शेतकरी शंकर कारभारी आव्हाड यांच्या घराचे पत्रे उडून त्यांचा प्रपंच उघड्यावर आला असल्याची माहिती दिली आहे.तालुक्यात अन्यत्र मोठे नुकसान झाल्याची कोठलीही नोंद आपत्ती व्यस्थापणाकडे झालेली नाही.