आरोग्य
योग्य उपचार घेतल्यास…त्या आजारावर मात करता येते-कोपरगावात माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोणत्याही आजारावर वेळेत योग्य उपचार घेतल्यास निश्चितपणे त्या आजारावर मात करता येते.आपले आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी बांधील असून अडीच वर्षात आरोग्य सेवा वाढविण्यावर भर दिला आहे असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.
“दरम्यान आज संपन्न झालेल्या शिबिरात एकूण ६१७ रुग्णांनी लाभ घेतला आहे.त्यात-३२७ पुरुष व २९० स्त्रीया सदर शिबिरामध्ये तपासणी करून खालील प्रमाणे रुग्ण शोधण्यात आले मोतीबिंदू शस्त्रक्रिया-३९ रुग्ण,उच्च रक्तदाब-५९ रुग्ण,मधुमेह-८४,हृदय रोग-१३,हर्निया-०२ रुग्ण,बालहृदय रोग दोन रुग्ण दंत चिकित्सा-२१ रुग्ण शोधण्यात आले आहे”-डॉ.कृष्णा फुलसुंदर,अधीक्षक कोपरगाव ग्रामीण रुग्णालय.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे आज रोजी मोफत आरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्याचे उदघाटन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास घोलप,ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौंदर,डॉ.गोवर्धन सांगळे,डॉ.अजय गर्जे,डॉ.चंद्रशेखर आव्हाड,डॉ.हेमंत राठी,डॉ.संजय महाजन,डॉ.संजय उंबरकर,डॉ.रमेश कोठारी,डॉ.दीपाली आचार्य,डॉ.अनिल उंडे,डॉ.आतिष काळे,डॉ.कुणाल घायतडकर,डॉ.विजय क्षीरसागर,डॉ.अमित नाईकवाडे,डॉ.योगेश लाडे,डॉ.मंजुषा गायकवाड,डॉ.सायली भागरे,डॉ.तेजश्री चव्हाण,डॉ.शेळके,डॉ.पूजा गर्जे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन चांदगुडे,माजी उपसभापती अर्जुन काळे,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,संदीप पगारे,मेहमूद सय्यद,राजेंद्र वाकचौरे,अजीज शेख,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,सामाजिक कार्यकर्ते संजय काळे,रमेश गवळी,दिनकर खरे,फकीर कुरेशी आदींसह नागरिक उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की,”मतदार संघाची आरोग्यसेवा वाढली पाहिजे त्यासाठी प्रयत्न सुरु होते.मागील दोन वर्ष आपण सर्वांनी कोरोनाच्या बाबतीत जे अनुभवलं त्यामुळे आरोग्य सेवा किती गरजेची आहे हे दिसून आले आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेत आजाराची सखोल माहिती नसतांना देखील आरोग्य विभागाने अनुभवाच्या जोरावर पहिली लाट परतवून परिस्थिती नियंत्रणात आणली. दुसऱ्या लाटेत देखील कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधा निर्माण करून ५० बेडचे स्वतंत्र कोविड वार्ड निर्माण केला आहे.ऑक्सिजन प्लांट उभारला व तालुका ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण केला आहे.माजी आ.अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव ग्रामीण रुग्णालय उभारून कोपरगावला १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रस्ताव दाखल केला होता. त्यासाठी केलेल्या पाठ्पुराव्यातून ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होवून उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी मिळाली असून नवीन इमारतीच्या कामाची लवकरच निविदा प्रसिद्ध होणार असल्याची माहिती त्यांनी शेवटी दिली आहे.
दरम्यान आज ग्रामीण रुग्णालय येथे संपन्न झालेल्या भव्य मोफत आरोग्य मेळाव्यात यासाठी खा.सदाशिव लोखंडे उपस्थित होते सदर शिबिरात एकूण ६१७ रुग्णांनी लाभ घेतला आहे.त्यात-३२७ पुरुष व २९० स्त्रीया सदर शिबिरामध्ये तपासणी करून खालील प्रमाणे रुग्ण शोधण्यात आले मोतीबिंदू शस्त्रक्रिया-३९ रुग्ण,उच्च रक्तदाब-५९ रुग्ण,मधुमेह-८४,हृदय रोग-१३,हर्निया-०२ रुग्ण,बालहृदय रोग दोन रुग्ण दंत चिकित्सा-२१ रुग्ण शोधण्यात आले आहे.सदर शिबिरामध्ये देहदानासाठी-०४,नेत्रदानासाठी -०२ लोकांनी समतीपत्र भरून दिले व रक्तदान-०९ लोकांनी केले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विकास घोलप व डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ.विकास घोलप यांनी मानले आहे.