सहकार
कोपरगाव पीपल्स बँकेत…यांच्या प्रतिमेचे अनावरण

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव पीपल्स बँकेचे ज्येष्ठ सदस्य व गेली पन्नास वर्षे संचालक असलेले कै.रतनचंद ठोळे यांचे नुकतेच निधन झाले होते.त्यांच्या बँकेतील योगदानाची दखल घेऊन संचालक मंडळाने त्यांची प्रतिमा बँकेच्या कार्यालयात लावण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला होता .त्यानुसार सहा एप्रिल २२ रोजी एका कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेचे अनावरण मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी ठोळे कुटुंबातील सदस्य व कै.रतनचंद ठोळे यांच्याबरोबर काम केलेले ज्येष्ठ सदस्य दत्तात्रेय कंगले, कांतीशेठ अग्रवाल,माणिकचंद बागरेचा,ताराचंद गंगवाल,अजितशेठ लोहाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतिमेचे अनावरण करण्यात आले आहे.
याप्रसंगी महाव्यवस्थापक एकबोटे यांनी प्रास्ताविक केले तर बँकेचे अध्यक्ष सत्यम मुंदडा यांनी कै.रतनचंद ठोळे यांनी बँकेत दिलेले योगदान कायम आमच्या स्मरणात राहील असे सांगितले तसेच दत्तात्रय कंगले व अजितशेठ लोहाडे यांनी कै.रतनचंद ठोळे यांच्या आठवणींना उजाळा दिला व बँकेने चांगला कारभार करावा असे आवाहन केले आहे.ज्येष्ठ संचालक कैलासशेठ यांनी ठोळे परिवाराच्या वतीने संचालक मंडळाचे आभार मानले संचालक धरमचंद बागरेचा यांनी उपस्थितांचे आभार मानले
याप्रसंगी बँकेबाबू उपाध्यक्षप्रतिभा शिलेदार,संचालक अतुल काले,कल्पेश शहा, हेमंत बोरावके ,डॉक्टर विजय कोठारी,सुनील कंगले,एड.संजय भोकरे,प्रभावती दीपक पांडे उपस्थित होते.