कोपरगाव तालुका
…त्या हत्येतील कार सापडली,पोलिसानी घेतली ताब्यात
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या भोजडे चौकी नजीक रहिवाशी असलेल्या सुरेश शामराव गिऱ्हे या शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखाची हत्या केल्या नंतर त्यातील आरोपी रवी आप्पासाहेब शेटे व विजय खर्डे यासह सहा आरोपीनी गुन्ह्यात वापरलेली मारुती स्विफ्ट डिझाइर हि कार घोयगाव शिवारात पंक्चर झाल्याने सोडून दिली असल्याची माहिती वैजापूर पोलिसानी कोपरगाव पोलिसांना दिली असून सदरची कार ताब्यात घेण्यासाठी कोपरगाव पोलीस ठाण्याचे पथक तिकडे सायंकाळी सहाच्या सुमारास रवाना झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
नगर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याची सीमा रेषा असून या सीमारेषेवर वैजापूर तालुका आहे.तेथील नागरिकांना एक एक बेवारस कार आढळून आली होती त्यांनी या बाबत आधी वैजापूर पोलिसांना व त्यानी नंतर कोपरगाव तालुका पोलिसांना या बाबत कळवले आहे. हि कार ताब्यात घेण्यासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे उप पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे हि कार ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले असून त्यांनी ती ताब्यात घेऊन ते कोपरगाव कडे रवाना झाले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव तालुक्यात सहा वर्षांपूर्वी संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत संवत्सर चौफुलीवर वाळूचोरांच्या दोन टोळ्यात हाणामारी होऊन त्यात भोजडे येथील तरुणांची वाळूचोरीच्या भानगडीतून सन-२०१२ मध्ये बंटी शिनगर याच्या हत्येत संवत्सर रवी आप्पासाहेब शेटे हा एक आरोपी आहे. त्यानीच हि हत्या केल्याची फिर्यादी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात मयत तरुणांच्या पित्याने दाखल केली आहे. या घटनेतील काही आरोपींना दहा वर्षांची शिक्षा झाली होती.तर काही आरोपी फरार झाले होते.त्यातील एक फरार आरोपी पैकी रवी शेटे आहे.तो अनेक गुन्ह्यात पोलिसांना हवा होता.त्यावर अनेक गुन्हे दाखल होते.त्यातून त्याला हद्दपारही केले होते.तो पासून हा आरोपी फरार असून त्याचे व व भोजडे येथील हत्या झालेला सुरेश गिऱ्हे यांचे वाळू व्यवसायातून बिनसले होते.व ते एकमेकांच्या जीवावर उठले होते.त्यातून हा सुडाचा प्रवास सुरु झाला आहे.
प्रतिकात्मक छायाचित्र
त्यांनी या गुन्ह्यात वापरलेली मारुती स्विफ्ट डिझायर व एक बजाज पल्सर हि दुचाकी वापरल्याचे सिद्ध झाले आहे.पोलीस या आरोपींचा शोधात आहेत.त्यासाठी विविध दिशांना पाच पथके रवाना केलेले आहेत.त्यात नगर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याची सीमा रेषा असून या सीमारेषेवर वैजापूर तालुका आहे.तेथील नागरिकांना एक एक बेवारस कार आढळून आली होती त्यांनी या बाबत आधी वैजापूर पोलिसांना व त्यानी नंतर कोपरगाव तालुका पोलिसांना या बाबत कळवले आहे. हि कार ताब्यात घेण्यासाठी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे उप पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे हि कार ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले असून त्यांनी ती ताब्यात घेऊन ते कोपरगाव कडे रवाना झाले आहे.मात्र या कारचे दरवाजे व काचा सताड उघड्या असल्याचे त्यांना आढळून आले आहे त्यात त्यांना कोणतीही हत्यारे आढळून आली नाही.दरम्यान आरोपीनी पुढील प्रवास वाहन बदलून केला असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान मयत सुरेश गिऱ्हे याच्यावर शवविच्छेदना नंतर भोजडे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.