जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुका पोलीस ठाणे व वसाहतीसाठी…इतक्या कोटींचा निधी-उपमुख्यमंत्री

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव शहराच्या पोलीस ठाण्याची,पंचायत समिती,व राज्य परिवहन विभागाचे कोपरगाव बस आगाराची इमारत बांधून पूर्ण झाली आहे.मात्र तालुका पोलीस ठाण्यासाठी इमारत नाही व पोलिसांना राहण्यासासाठी वसाहत नाही त्या साठी आगामी काळात आपण कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी ०४ तर पोलीस वसाहतीसाठी एकवीस कोटी रुपयांचा असा तालुक्यांसाठी २५ कोटींचा निधी व व्यावसायिक गाळ्यांचे बी.ओ.टी.तत्वावर घोषणा केली असून त्या साठी आपण लवकरच आगामी अर्थसंकल्पात तरतूद मंजूर करू असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोपरगाव शहरातील एका कार्यक्रमात बोलताना दिले आहे.

“माजी खा.स्व.शंकरराव काळे यांनीं पारनेरचे विधानसभेत नेतृत्व केले व सहकारी चळवळीचे नेतृत्व केले.शरद पवार यांच्या पुलोद आघाडीत राज्यमंत्री म्हणून नेतृत्व केले असल्याची आठवण करून सहकारी साखर कारखाना,व सहकारी चळवळ,व रयत शिक्षणाची चळवळ पुढे त्यांनी नेटाने चालवली सन-१९९१ साली लोकसभेत नेतृत्व केले होते.त्यांचा वारसा आज आ.आशुतोष काळे हे करत आहे”-ना.दिलीप वळसे पाटील,गृहमंत्री महाराष्ट्र राज्य.

कोपरगाव शहरात अनेक महिन्यापासून बांधून उदघाटनांच्या प्रतीक्षेत असलेले कोपरगाव शहर पोलीस ठाणे,कोपरगाव पंचायत समिती,राज्य परिवहन विभागाचे कोपरगाव बस आगार,माजी खा.शंकरराव काळे यांचा पुर्णाकृती पुतळ्याचे उदघाटन आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते,तर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

सदर प्रसंगी राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ,खा.सुजय विखे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले,बाबासाहेब भोसले,येवल्याचे आ.किशोर दराडे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश दंडवते,माजी आ.दादा कळमकर,भानुदास मुरकुटे,अशोक काळे,पांडुरंग अभंग,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर,भाऊसाहेब चिकटगावकर,मीनाताई जगधने,अशोक बाबर,आयुक्त राधाकृष्ण गमे,जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले,जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील,सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र झावरे,श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र फाळके,राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे,जिल्हा संघटक सचिन मुजगुले,साई विश्वस्त डॉ.एकनाथ गोंदकर,सुरेश वाबळे,जिल्हा बँकेच्या माजी संचालक चैताली काळे,स्नेहलता शिंदे आदी मान्यवर होते.

“आपण शब्दाचे पक्के असून कोपरगावकरांना दिलेल्या शब्दाला बाधा येऊ देणार नाही” मात्र कोपरगाव तालुक्यातील मतदारांनी आ.आशुतोष काळे यांना फार कमी मते दिली असल्याचा खेद व्यक्त करून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तुम्हाला हजारोच्या पुढे मताधिक्य द्यावे लागेल”असे आवाहन केले व त्यासाठी त्यांनी बारामतीत त्यांना मिळणारे मताधिक्य व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचेही मताधिक्य सांगून असे मताधिक्य त्यांना दयावे लागेल अशी हात जोडून विनंती करुन केवळ ८०० मतांचे नको”-अजित पवार,उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.

त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आपण कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उदघाटन केले त्यावेळी आ.आशुतोष काळे यांनी आपल्याला सदर इमारतीतून पोलीस वसाहतीची दुरवस्था दाखवली आहे.त्यामुळे आपण या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.व त्यासाठी हा निधी मंजूर केला आहे.कोपरगाव शहरातील भूमिगत गटारी करण्याची गरज प्रतिपादन करून गाव डास मुक्त करण्यसाठी या गटारी गरजेच्या आहेत अशी पुष्टि जोडून शहरातील बस स्थानकाच्या बाजूने,”बांधा-वापरा-हस्तांतरित करा”(बी.ओ.टी.) या तत्वावर व्यापारी संकुल उभे करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू,”आपण शब्दाचे पक्के असून शब्दाला बाधा येऊ देणार नाही” मात्र कोपरगाव तालुक्यातील मतदारांनी आ.आशुतोष काळे यांना फार कमी मते दिली असल्याचा खेद व्यक्त करून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत तुम्हाला हजारोच्या पुढे मताधिक्य द्यावे लागेल”असे आवाहन केले व त्यासाठी त्यांनी बारामतीत त्यांना मिळणारे मताधिक्य ०१ लाख ६५ हजारांचा पुढे असल्याचे उदाहरण दिले.व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचेही मताधिक्य सांगून असे मताधिक्य त्यांना दयावे लागेल अशी हात जोडून विनंती करुन केवळ ८०० मतांचे नको अशी कोपरखिळी लगावली.व आगामी काळात असे चालणार नाही असे सांगितले.त्यावेळी समोर बसलेल्या उत्साही कार्यक्रर्त्यांनी त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत ग्वाही देत असताना व आ.काळे यांच्या घोषणा देण्याचे काम सुरु केले असता उगीच घोषणा नको आता पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीचे घोडा मैदान जवळच असल्याचे कृती करा,”आपण दिलेल्या शब्दाचे पक्के आहे मात्र तुम्ही शब्दाला जागा”असा उपस्थितांना चिमटा काढला आहे.

दरम्यान त्यांनी पुढे बोलताना त्यांनी कोपरगाव तालुक्याच्या सिंचनाचा प्रश्न गंभीर असून याबाबत कायम नगर-नाशिक जिल्ह्याचे पाण्याववरून वाद होत असतात याची आपल्याला माहिती आहे.मात्र पाण्यावर सर्वांचा समान अधिकार आहे हे विसरून चालणार नाही.त्या साठी आपण पश्चिमेचे पाणी पूर्वेस गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळवणार असून त्यादृष्टीने काम जलसंपदा विभागाने सुरु केले आहे.त्यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाचा आढावा घेऊन आगामी ०१ मे या महाराष्ट्र दिनी नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उदघाटन करणार आहे.त्या वेळी त्यांनी राज्यातील नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी यांना जिल्हा बँकेच्या वतीने कर्ज क्षमता तीन लाखांपर्यंत वाढवली असल्याचे सांगून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देणार असल्याचे जाहीर केले आहे.राज्यातील ऊस उत्पादनातील वाढीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.व सर्व कारखाने ‘मे’च्या शेवटपर्यंत सुरु ठेवणार असल्याचे आ.काळे यांचा संदर्भ देऊन सूतोवाच केले आहे.

दरम्यान कोपरगाव शहरासाठी बस स्थानक,पंचायत समिती,शहर पोलीस ठाणे पूर्ण करण्यात आले आहे तर आघाडी सरकारने १३४.२४ कोटींचा साठवण तलाव मंजूर केला आहे.याखेरीज आज नूतन तालुका पोलीस ठाणे व पोलीस वसाहत यांना २५ कोटींचा निधी,भूमिगत गटार,बस स्थानकाच्या सर्व बाजूनी बी.ओ.टी.तत्वावर मंजूर करण्याचे आश्वासन देऊनही कोपरगाव शहरातील कार्यकर्ते व नागरिक यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी आढळल्याने याचे कारण काय ? याबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

कोरोना साथीनंतर अडीच वर्षात आ.काळे विजयी झाल्यानंतर हा आपला पहिलाच दौरा असल्याचे सांगून कोपरगावच्या चुरशीच्या लढतीत आ.आशुतोष काळे विजयी झाले त्यांनी त्याबद्दल मतदारांचे प्रारंभी आभार मानले आहे.

प्रारंभी त्यांनी आपण सन-१९९१ लोकसभेची निवडणूक लढवली होती.व खासदार म्हणून सहा काम केले असताना त्यावेळचे पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांनी आपल्याला राजीनामा द्यायला सांगून शरद पवार साहेबांची दिल्लीत गरज असल्याचे सांगून त्यांना पाठविण्याची विनंती केली होती.व आपण राजीनामा देऊन पुन्हा बारामतीत आलो असल्याचे सांगून त्यावेळी त्यांनी तत्कालीन कोपरगावचे खा.स्व.शंकरराव काळे यांच्या कामाचा अनुभव सांगितला. त्यांनी आम्ही नवखे असताना त्यांच्या कामाचा अनुभव सांगून आम्ही आमच्या मतदार संघात सात वेळा निवडून आलो पण मतदारसंघ सोडून अन्यत्र निवडून येण्याचे धाडस आमच्यात नाही हे काबुल करून त्यांनी शंकरराव काळे यांच्या पारनेर मधील दोनदा निवडून येण्याच्या त्या वेळच्या धाडसाचे कौतुक केले आहे.रयत शिक्षण संस्थेत यांनी कर्मवीर भाऊराव पाटलानंतर सर्वाधिक काम केले असल्याचे गौरवोद्गार काढले आहे.व त्यांनी कर्मवीरांना दिलेल्या शब्दा प्रमाणे हयात असे पर्यंत स्वतःच्या संस्था काढल्या नाहीत.

सदर प्रसंगी पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आगामी काळात आ.काळे यांना आभाळासारखी मदत करू व तालुका चकाचक करू असे आश्वासन दिले असून जिल्ह्यातील घरकुलांच्या कामासह विविध विकास कामांचा आढावा घेतला आहे.ग्रामपंचायतीच्या आठ नंबरच्या उताऱ्यात नोंद घेतलेल्या जागेस कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

सदर प्रसंगी गृहमंत्री दिलीप वळसे हे मार्गदर्शन करताना म्हणाले की,आ.काळे यांनी ना.अजित दादांच्या गाडीचे सारथ्य केले व विविध विकास कामांना निधीची मागणी सातत्याने केले आहे.व ना.अजित दादांनी त्यांचे खूप लाड केले आहे.(हशा) त्यावेळी त्यांनी माजी खा.शंकरराव काळे यांच्या जिल्हा परिषदेपासून सुरू केलेल्या राजकीय कार्याचा आढावा घेतला व पुढें पारनेरचे विधानसभेत नेतृत्व केले व सहकारी चळवळीचे नेतृत्व केले.शरद पवार यांच्या पुलोद आघाडीत नेतृत्व केले असल्याची आठवण करून सहकारी साखर कारखाना,व सहकारी चळवळ,व रयत शिक्षणाची चळवळ पुढे त्यांनी नेटाने चालवली सन-१९९१ साली लोकसभेत नेतृत्व केले होते.त्यांचा वारसा आज आ.आशुतोष काळे हे करत आहे.ग्रामीण पोलीस ठाणे,व अधिकारी व पोलीस वसाहत मंजूर करण्याचा चेंडू ना.अजित पवार यांचे कोर्टात टोलवला आहे.

दरम्यान सदर प्रसंगी सर्व उदघाटने आटोपल्यावर दक्षिण नगर लोकसभा मतदार संघाचे खा.डॉ.सुजय विखे हे कार्यक्रम सुरु झाल्यावर कार्यक्रम स्थळी आले व त्यांनी यजमानाकडून सत्कार स्वीकारून लगेच आल्या पावली परत फिरले आहे.राज्यात पवार-विखे घराणे यांच्यातील राजकीय वाद सर्वविदित आहे या पार्श्वभूमीवर हि उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान दुसऱ्या बाजूस शिर्डीचे खा.सदाशिव लोखंडे यांचे पत्रिकेत नाव नसल्याने आधीच शिवसेना नाराज असताना आज त्यांची अनुपस्थिती डोळ्यात भरणारी ठरली आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी केले त्यावेळी त्यांनी आघाडी सरकारने तालुक्याच्या विविध विकास कामांना जवळपास एक हजार कोटी रुपयांचा निधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक केले व अजून गोदावरी उजव्या कालव्याचे काम प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणून दिले व कोपरगाव तालुक्याच्या शेती सिंचनाला समन्यायीचा अडथळा असल्याचे सांगून आगामी काळात अशीच मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उद्धव कालापहाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार स्नेहल शिंदे यांनी मानले आहे.त्यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close