कोपरगाव तालुका
कोपरगावात विविध विकास कामांचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ०६ एप्रिल रोजी उदघाटन

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रातिनिधी)
कोपरगाव शहरात बस आगार, पोलीस स्थानक अशा विविध विकास कामांच्या उदघाटनासह कोपरगाव पंचायत समितीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या माजी खा.स्व.शंकरराव काळे यांच्या पुतळ्याचे अनावरण बुधवार दि.०६ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या हस्ते सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे अशी माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन यांनी दिली आहे.
कर्मवीर शंकरराव काळे हे १९६२ साली नगर जिल्हा परिषदेचे पाहिले अध्यक्ष म्हणून निवडून आले होते.यांच्या काळात जिल्ह्या साठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते.त्यांनी स्व.गणपतराव औताडे यांच्या नंतर कोपरगाव सरकारी साखर कारखाना यशस्वीपणे चालवला होता.
कोपरगाव शहरात अनेक महिन्यापासून बांधून उदघाटनांच्या प्रतीक्षेत असलेल्या कोपरगाव शहर पोलीस ठाणे,कोपरगाव पंचायत समिती,राज्य परिवहन विभागाचे कोपरगाव बस आगार आदिंचे उदघाटनाचा मुहूर्त सापडला असून ते आगामी ०६एप्रिल रोजी संपन्न होत आहे.दरम्यान याच कार्यक्रमात माजी खा.स्व.शंकरराव काळे यांच्या पुतळ्याचे उदघाटन संपन्न होणार आहे.
कर्मवीर शंकरराव काळे हे १९६२ साली नगर जिल्हा परिषदेचे पाहिले अध्यक्ष म्हणून निवडून आले होते.यांच्या काळात जिल्ह्या साठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते.त्यांनी स्व.गणपतराव औताडे यांच्या नंतर कोपरगाव सरकारी साखर कारखाना यशस्वीपणे चालवला होता.या खेरीज रयत शिक्षण संस्थेचे ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नंतर सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषवले होते.या काळात त्यांनी रयतेच्या अनेक शाखा राज्यभर वाढवल्या होत्या.व त्यांनी कर्मवीरांना दिलेला,”स्वतःच्या खाजगी शिक्षण संस्था वाढवणार नाही”हा शब्द अखेरपर्यंत पाळला होता.त्यांच्या स्मृतींप्रीत्यर्थ कोपरगाव पंचायत समितीच्या समोर पूर्णकृती पुतळ्याची उभारणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे.कोपरगाव पंचायत समिती गत पंचवार्षिक कालखंडात माजी आ.अशोक काळे यांच्या समर्थकांच्या ताब्यात असताना पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोपरगाव पंचायत समितीच्या प्रांगणात त्यांचा पुतळा उभारण्यात आलेल्या या पुतळ्याचे अनावरणासाठी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या समवेत राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री ना.जयंत पाटील
,महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात,गृहमंत्री ना.दिलीप वळसे पाटील,ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ,जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख,ऊर्जा राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे आदी मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. तसेच कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी मतदार संघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे उपाध्यक्ष नारायण मांजरे यांनी शेवटी केले आहे.