कोपरगाव तालुका
..त्या आरोपींवर कठोर कारवाईची वकील संघाची मागणी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील लौकी येथील मूळ रहिवाशी व कोपरगावात येथील न्यायालयात वकिली व्यवसाय करत असलेले वकील संघाचे माजी अध्यक्ष मच्छीन्द्र सुखदेव खिलारी (वय-६०) यांना व त्यांच्या मुलास,साक्षीदारास नुकतीच लौकी शिवारातील गट क्रमांक १०८ मध्ये त्यांच्या शेतशेजारचे आरोपीनीं मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज सकाळी कोपरगाव वकील संघाच्या सदस्यांनी एकत्र येत कार्यालयात निषेध सभा घेत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल कटके यांना समक्ष भेटून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे कि,कोपरगाव तालुक्यातील लौकी ग्रामपंचायत हद्दीतील मूळ रहिवाशी असलेले मात्र वकिली व्यवसायानिमित कोपरगाव शहरातील इंदिरा पथ मार्गावरील गौरी शंकर हौसिंग सोसायटीतील रहिवाशी मच्छीन्द्र खिलारी हे कोपरगाव न्यायालयात आपला वकिली व्यवसाय करतात.त्यांची आपल्या लौकी गावात शेती आहे त्यांचा व शेजारचे शेतकरी यांचा जमिनीच्या कारणावरून वाद आहेत.त्याबाबत कोपरगाव न्यायालयात दावेही चालू आहेत.दरम्यान मच्छीन्द्र खिलारी हे आपल्या शेतात काल बुधवार दि.११ मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास आपल्या जळालेल्या पेरूच्या बागेचा पंचनामा कारणासाठी तलाठ्याला घेऊन गेले होते.पंचनामा झाल्यानंतर ते आपल्या ग.नं.१०८ मधून आपल्या घरी जात होते.त्या दरम्यान वरील आठ आरोपी हे गज,काठ्या,स्टम्प घेऊन आले व त्यांनी फिर्यादी मच्छीन्द्र खिलारी यांना स्टम्पने मारहाण केली असून व त्यांचा मुलाच्या कानास चावा घेतला आहे.व साक्षिदार यांना शेती बाबत कोर्टात चाललेल्या दाव्याच्या कारणावरून गज,काठ्यांनी मारहाण केली होती.तसेच फिर्यादी मच्छीन्द्र खिलारी यांच्या वाहनाचे नुकसान करून दाव्याचे कागदपत्र फाडून टाकले होते.
या बाबत आरोपी कैलास संपत खिलारी,विलास संपत खिलारी, दिलीप संपत खिलारी, ऋषिकेश दिलीप खिलारी,मुकेश दिलीप खिलारी,योगेश कैलास खिलारी,संकेत विलास खिलारी, शैलेश विलास खिलारी आदी आठ जणांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर आरोपीनी अड्.मच्छीन्द्र खिलारी यांच्यावर दावा दाखल केला आहे.त्याचे पडसाद कोपरगाव वकील संघात उमटले असून आरोपींविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष शिरिषकुमार लोहकणे यांनी आपले पदाधिकारी व सदस्यांसह कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना सुपूर्त केले आहे.त्यांनी वैद्यकीय तपासणी अहवाल आल्यांनंतर पुढील कारवाई चे आश्वासन दिले आहेत.
सदर प्रसंगी सर्वश्री अड्.आर.एस.जपे, आर.टी.भवर,एस.एम.वाघ.वकील संघाचे माजी अध्यक्ष जयंत जोशी,शंतनू धोर्डे,डी. व्ही. जोशी,अड्.सौ धोर्डे,सौ,गुजराथी,सौ,भुसे, सौ,देशमुख, दिलीप लासुरे,अमोल टेके,गौरव गुरसळ,एम.एस.भिडे,साहेबराव औताडे,बाळासाहेब कडू,रक्ताटे,एम.एल.मोरे,गंगावणे,अशोक टुपके,एस.के.जाधव,संजय भोकरे,योगेश खालकर,मनोज कडू,श्री गुजर,सरकारी वकील अशोक वहाडणे,डी. जी.देवकर,एन आर.काकड,व्ही. पी.ख्रिस्ते, उत्तम पाईक, एस.एम.सांगळे,ग्रंथपाल श्री देवकर आदींसह बहुसंख्येने वकील उपस्थित होते.