गुन्हे विषयक
अवैध दारू जप्त,कोपरगावात गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात नुकतीच कोपरगाव शहर पोलिसांनी छापा टाकला असून त्यात आरोपी चंदर बाबुराव पवार (वय-५२) याने अवैध भिंगरी व अवैध दारू विक्रि करताना आढळून आल्याने त्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे अवैध व्यवसायिकांत खळबळ उडाली आहे.
कोपरगावातील आरोपी चंदर बाबुराव पवार हा अवैध दारू विक्री करताना आढळून आला होता.त्यात ०४ हजार ८०० रुपये किमतीच्या देशी भिंगरी संत्रा कंपनीच्या १८० मी.ली.च्या ८० बाटल्या किंमत ६० रुपये,या शिवाय ७०० रुपयें किमतीची १४ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू सात प्लास्टिकच्या बाटल्यामंध्ये आढळुन आल्या होत्या.त्यांची एकूण किंमत ०५ हजार ५०० रुपये आहे.
कोपरगाव शहरात अवैध व्यवसाय वाढले असून त्यातून अनेक गुन्हे दाखल होत आहे.अशीच घटना कोपरगाव शहरात दि.१९ फेब्रुवारी रोजी ०३.३८ वाजता घडली असून या गुन्हयाची खबर शहर पोलिसांना मिळाली होती.त्या नुसार त्यांनी धाड टाकली असता त्यात आरोपी चंदर बाबुराव पवार हा अवैध दारू विक्री करताना आढळून आला होता.त्यात ०४ हजार ८०० रुपये किमतीच्या देशी भिंगरी संत्रा कंपनीच्या १८० मी.ली.च्या ८० बाटल्या किंमत ६० रुपये,या शिवाय ७०० रुपयें किमतीची १४ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू सात प्लास्टिकच्या बाटल्यामंध्ये आढळुन आल्या होत्या.त्यांची एकूण किंमत ०५ हजार ५०० रुपये आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध गु.क्रं.६६/२०२२ महाराष्ट्र प्रोव्हीबिशन ऍक्ट ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस.आर.शेवाळे हे करीत आहेत.