गुन्हे विषयक
वीस लाखांची फसवणूक,कोपरगावात आरोपीस ०५ दिवसांची पोलीस कोठडी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ असलेल्या नगर-मनमाड रोडच्या बाजूला आरोपी प्रदीप चव्हाण,बाळू (पूर्ण नाव माहिती नाही),गोविंद,(पूर्ण नाव माहिती नाही) फारूक मोहमद शेख,रा.मांडवी मुंबई,आदींनी रिझर्व्ह बँकेची एक योजना असून त्यात दोन नोटा देतात व त्यातील एक न कारखान्यात ठेवली जाते व दोन नोटा बाजारात ‘गोल्ड बॉण्ड’ सारख्या बाजारात आणल्या जातात अशी बतावणी करून,”तुम्ही रक्कम भरली तर ती तिप्पट करून मिळेल” अशी थाप मारून वीस लाखांचा डल्ला मारल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नाशिक गंगापूर रोड येथील फिर्यादी संदीप मुरलीधर पाटील यांनी दाखल केला होता. या प्रकरणी एक आरोपी फारूक मोहमद शेख यास कोपरगाव शहर पोलिसानी जेरबंद केले असून आज त्यास कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री डोईफोडे यांचे न्यायालयासमोर हजर केले असता त्यास न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी त्यांनी एक आरोपी फारूक मेहमूद शेख (वय-४९) रा.मांडवी मुंबई,ह.मु.राजब बिल्डिंग पहिला मजला रूम.क्रं.०९ यास कोपरगाव शहर पोलिसांनी काल रात्री ९.१० वाजता जेरबंद केले असून आज त्यास कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री डोईफोडे यांचे समोर आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास हजर केले व सरकारी पक्षाचेव वतीने अड्.एस.ए.व्यवहारे यांनी आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यास मान्यता दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी संदीप पाटील हे नाशिक येथील गंगापूर रोड पद्मविश्व डायमंड बिल्डिंग प्लॉट क्रं.०६ येथील रहिवासी असून त्यांना आरोपी प्रदीप चव्हाण,बाळू (पूर्ण नाव माहिती नाही),गोविंद,(पूर्ण नाव माहिती नाही) फारूक मोहमद शेख,रा.मांडवी मुंबई,आदींनी ओळख तयार करून त्यांना एक योजनेची रिझर्व्ह बँकेच्या एका बनावट योजनेची माहिती देऊन करून दि.१५ मार्च रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास या योजनेत,”हि बँक दोन नोटा देते व त्यातील एक नोट कारखान्यात खात्रीसाठी ठेवली जाते व दोन नोटा बाजारात ‘गोल्ड बॉण्ड’ सारख्या बाजारात आणल्या जातात जर तुंम्ही या योजनेत सहभागी झाले तर तुम्हाला तुम्ही जेवढी रक्कम समक्ष भराल त्या पेक्षा लगेच दुप्पट रक्कम मिळेल” अशी बतावणी तुम्ही रक्कम भरली तर ती तिप्पट करून मिळेल अशी थाप मारून रुपये २० लाखांचा डल्ला मारला होता.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नाशिक गंगापूर रोड येथील फिर्यादी संदीप मुरलीधर पाटील यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.६२/२०२२ भा.द.वि.कलम-४२०,४८९,(ब) (ई)३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध दाखल केला होता.या प्रकरणी घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचेसह पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,आदींनी भेट दिली होती.व तपासाची चक्रे तपासी अधिकारी रोहिदास ठोंबरे यांनी वेगाने फिरवली होती.
या प्रकरणी त्यांनी एक आरोपी फारूक मेहमूद शेख (वय-४९) रा.मांडवी मुंबई,ह.मु.राजब बिल्डिंग पहिला मजला रूम.क्रं.०९ यास कोपरगाव शहर पोलिसांनी काल रात्री ९.१० वाजता जेरबंद केले असून आज त्यास कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री डोईफोडे यांचे समोर आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास हजर केले व सरकारी पक्षाचेव वतीने अड्.एस.ए.व्यवहारे यांनी आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यास दि.२२ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.
या प्रकरणी अद्याप तीन आरोपी जेरबंद करण्याचे काम बाकी आहे.या शिवाय एक पांढऱ्या रंगाची मारुती डिझायर गाडी,ज्या माशीनच्या सहाय्याने नोटा छापल्या ते मशीन जप्त करण्याचे काम बाकी असून त्यासाठी शहर पोलिसांना कंबर कसावी लागणार आहे.