शैक्षणिक
कोपरगावात…या विदयालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांतील इयत्ता दहावी मधील विदयार्थीचा निरोप समारंभ मोठा उत्साहाने संपन्न झाला आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे उपस्थित होते.
“विद्यार्थ्यांनी पुढील वाटचालीत डाॕक्टर कींवा इंजिनिअर होण्यापेक्षा उद्योजक बनावे.आपले व्यक्तीमत्व विकसित करुन उत्तम नागरीक व्हावे आणि देशसेवा करावी”-कैलास ठोळे,अध्यक्ष,कोपरगांव एज्युकेशन सोसायटी.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लबचे अध्यक्ष राम थोरे व सचिव अक्षय गिरमे,यश अॕकेडमी चे इनामदार व जपे तर विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,जेष्ठ शिक्षक डी.व्ही.तुपसैंदर,व्ही.एन कार्ले,इ.एल.जाधव,आर.आर.लकारे,ए.के.काले,एन.के.बडजाते,एस.एन.शिरसाळे,डी.ए.देसाई,एन.डी.होन,ए.बी.अमृतकर,सौ.एस.एस.अजमेरे आदी शिक्षक व विदयार्थी सुरक्षित अंतर पाळुन उपस्थित होते.
त्यावेळी कैलास ठोळे पुढे बोलताना म्हणाले की,”विद्यार्थ्यांनी पुढील वाटचालीत डाॕक्टर कींवा इंजिनिअर होण्यापेक्षा उद्योजक बनावे.आपले व्यक्तीमत्व विकसित करुन उत्तम नागरीक व्हावे आणि देशसेवा करावी असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास ठोळे यांनी केले आहे.सध्याची जागतिक स्तरावरील युध्दजन्य परीस्थिती लक्षात घेवुन विदयार्थीनी आपली पुढील वाटचाल ठरवावी असे मत संस्थेचे सचिव दीलीप अजमेरे यांनी मांडले.यश अॕकेडमीच्या वतीने विदयार्थीना रायटींग पॕडचे वितरण करण्यात आले आहे.
या प्रसंगी इ.दहावीतील विद्यार्थी कु.तनया संत,तन्मय निकम,सुयश जाधव आदि विदयार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.पाहुण्यांचे स्वागत पर्यवेक्षक आर.बी.गायकवाड यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस.डी.गोरे तर आभार जेष्ठ शिक्षक बी.बी.कुळधरण यांनी मानले आहे.