शैक्षणिक
यशासाठी विद्यार्थी जीवनात कष्टाला पर्याय नाही-पोलीस निरीक्षक जाधव
![](https://newsseva.in/wp-content/uploads/2022/02/download283729.jpeg)
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“सामाजिक कार्यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा व आपले जीवन आदर्श बनवावे, इमानदारी, प्रामाणिकपणा,सामाजिक नीतिमूल्य,विद्यार्थ्यांनी अंगीकारावे व कष्टाशिवाय जीवनात यश नाही.” असे प्रतिपादन यावेळी दौलतराव जाधव यांनी नुकतेच चासनळी येथे बोलताना केले आहे.
“कोपरगाव तालुक्याच्या शैक्षणिक जडणघडणीत के.जे.सोमय्या महाविद्यालय पूर्वीपासून अग्रेसर आहे तसेच चासनळी व धामोरी या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून अशोक रोहमारे यांनी आपल्या विनंतीला मान देऊन या भागात महाविद्यालय सुरू केले.व आमच्या भागातील मुलींच्या शिक्षणाची सोय झाली आहे”-चंद्रशेखर कुलकर्णी,माजी संचालक,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना.
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावी विज्ञान व वाणिज्य वर्गाचा सदिच्छा समारंभ व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला त्या वेळी ते बोलत होते.त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोपरगाव ग्रामीण विभाग पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीं कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे हे होते.
सदर प्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सदस्य चंद्रशेखर कुलकर्णी,संदीप रोहमारे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सुजित रोहमारे,के.जे.सोमय्या वरिष्ठ महाविद्यालय,कोपरगावचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव.के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळीचे प्राचार्य एन.जी.बारे
महाविद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर,कर्मचारी,पालक,विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंखने उपस्थित होत्या.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम,डॉ बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले यांसारख्या महान व्यक्तींचा आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवावा.”स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विविध व्यावसायिक अभ्यासक्रमात आपला ठसा उमटावा कोपरगाव तालुक्यातील के.जे.सोमय्या महाविद्यालय ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी कर्तव्यदक्ष असते शिक्षणाचे मुख्य ध्येय म्हणजे आदर्श व्यक्ती घडवणे आहे आणि हेच कार्य आपली संस्था पार पाडत आहे.” असेहि ते शेवटी म्हणाले आहे.
या कार्यक्रमात इयत्ता बारावी विज्ञान व वाणिज्य वर्गातील सार्थक कटारे,रोहन माळी,साक्षी आवारे, वैष्णवी खिलारी,दीपिका संधान,आयान शेख,सरिता नाजगड,राजश्री गाडे,तेजस्विनी गाडे आदींनी आपला दोन वर्षाचा शैक्षणिक प्रवास व्यक्त केला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.नारायण बारे यांनी केले तर कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सदस्य संदीप रोहमारे,प्राचार्य बी.एस.यादव,सुजित रोहमारे आदींनी मार्गदर्शन केले आहे तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.एस.बी.पवार व कु.साक्षी जेजुरकर यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार प्रा.एस.पी.ढेकळे यांनी व्यक्त केले.