कोपरगाव तालुका
एन.टी.एस. परीक्षेत ‘आत्मा मलिक’चे ३२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
एन. सी. ई. आर. टी नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, आयोजित राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल या शाळेचे ३२ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले. या परीक्षेचा राज्यस्तर निकाल नुकताच जाहिर झाला. परीक्षेसाठी राज्यातून ९४५४१ एवढे विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यातील ७७६ विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेसाठी पात्र झाले. सलग दुस–या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान आत्मा मालिकला मिळाला आहे.
गुरुकुलामध्ये दैनंदिन अध्यापना बरोबरच विविध स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षांची विशेष तयारी करुन घेतली जाते. यामुळे सर्व स्पर्धा परीक्षेत गुरुकुलाचे विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. अषी प्रतिक्रीया प्राचार्य निरंजन डांगे यांनी दिली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये राजवर्धन वाघ, मयूर गावित, कल्पेश गायकवाड, शरद मोरे, तन्मय पाटील, चेतन महाले, प्रणव मोकाटे, प्रसाद पवार, प्रषांत जाधव, प्रताप वाळके, चेतन बाजड, चेतना बागुल, सोहम खुळे, महेश अहिरे, अभिषक वाघ, सुजित लावरे, अर्जुन विर, आर्केष कटयारे, विनोद वडघने, अमोल सपकाळ, गिरीश महाले, तुषार दारुंटे, हितेश गोल्हार, सत्यम चव्हाण, शुभम पवार, सुयश बागुल, भारत पवार, विशाल गावित, अथर्व येवले, प्रशांत मिस्त्री, धनश्री भोये, शुभम बागुल आदींचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख रमेश कालेकर, सागर अहिरे, मीना नरवडे, सचिन डांगे पर्यवेक्षक अनिल सोनवणे, बाळासाहेब कराळे, रविंद्र देठे, सुनिल पाटील, विषय शिक्षक नयना शेटे, सचिन डांगे, अनिता वाणी, राजेंद्र जाधव, सोपान शेळके, किशोर बडाख, बाळकृष्ण दौंड, नितीन अनाप, गणेश कांबळे, प्रशांत खलाटे, मिना बेलोटे, वनिता एखंडे, आशा देठे, सुनंदा कराळे, राजश्री पिंगळे, बबन जपे, संजय कहांडळ यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव स्टॅ्राबेरी इंग्लिश मिडीयमच्या संचालक संज्योत वैद्य, ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, कोशाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गिरमे, प्राचार्य सुधाकर मलिक, व्यवस्थापक हिरामण कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला.
सर्व विद्यार्थ्यांचे परमानंद महाराज, निजानंद महाराज, उपाध्यक्ष भगवानराव दौंड, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, विश्वस्त वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमधडे, प्रकाश भट, माधवराव देशमुख, शिक्षक आदींनी अभिनंदन केले आहे.