पुरस्कार,गौरव
कोपरगावातील या शिक्षकास “माणुसकी सेवा गौरव पुरस्कार” जाहीर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
समाजातील सर्वसामान्य माणसाच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी निस्पृहपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फौंडेशन नाशिक संचलित ग्राहक उपभोगता संरक्षण समिती यांच्या वतीने राज्यस्तरीय माणुसकी सेवा गौरव पुरस्कार महाराष्ट्रातील विविध व जिल्ह्यातील १० नामवंत शैक्षणिक व सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हा पुरस्कार विविध मान्यवरांच्या हस्ते येत्या २६ तारखेला नाशिक येथे प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती माणुसकी सोशल फौंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी दिली आहे.
पुरुषोत्तम पगारे हे गेल्या ४० वर्षापासून स्वातंत्र्य सैनिक स्व.गवारे मामा यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक व सामाजिक कार्य करत आहे.गेल्या २९ वर्षापासून महाराष्ट्र शासनाची मान्यता घेऊन विना अनुदानित रात्रशाळा चालवणे व या शाळेत येणारे विद्यार्थी बूट पॉलिश करणारे,हॉटेल मधील कामगार,विटभट्टी वरील कामगार अशा उपेक्षित घटकांतील मुला-मुलींना शिक्षण प्रवाहात आणून त्यांना मदत करत आहेत.
कोपरगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रपति यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक पुरुषोत्तम पगारे यांची या राज्यस्तरीय माणुसकी सेवा गौरव पुरस्कारासाठी अहमदनगर जिल्ह्यातून निवड करण्यात आली आहे.
पुरुषोत्तम पगारे हे गेल्या ४० वर्षापासून स्वातंत्र्य सैनिक स्व.गवारे मामा यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक व सामाजिक कार्य करत आहे.गेल्या २९ वर्षापासून महाराष्ट्र शासनाची मान्यता घेऊन विना अनुदानित रात्रशाळा चालवणे व या शाळेत येणारे विद्यार्थी बूट पॉलिश करणारे,हॉटेल मधील कामगार,विटभट्टी वरील कामगार,अशा आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या व शालाबाह्य झालेल्या मुला मुलींना शिक्षण प्रवाहात आणून त्यांना मदत करत आहेत.हिन्दी या राष्ट्रभाषेच्या प्रचार प्रसारासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शिक्षकांना तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देणे हिन्दीच्या विविध परीक्षांना विविध विद्यार्थी बसवणे.हिन्दी विषय शिक्षकयाचे प्रश्न सोडविणे.वाचन संस्कृति वाढावी म्हणून सार्वजनिक वाचनालय चालवणे,महाराष्ट्र राज्य पातळीवर सेवाभावी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाल आनंद पुरस्कार या सारखे विविध पुरस्कार देण्याचे नियोजन करणे तसेच परित्यक्ता स्त्रिया यांचे प्रश्न व कौटुंबिक कलह मिटवणे.कागद काच भंगार जमा करणारी मुले यांना मदत करणे या सारखी अनेक सामाजिकदृष्ट्या दुर्लक्षित कामे करीत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून माणुसकी सोशल फौंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे.
माणुसकी सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल गवारे मामा फौंडेशनचे अध्यक्ष प्रभाकरराव बोरावके यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.