दळणवळण
कोपरगाव तालुक्यातील …या रस्त्याला दर्जोनोत्ती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील सडे-शिंगवे शिवरस्त्याचे ना.आशुतोष काळे यांनीं यापूर्वी जिल्हा परिषदेकडे असणाऱ्या या रस्त्याची दर्जोन्नती करून या मार्गाला प्रमुख जिल्हा मार्ग दर्जा देण्यात आला असल्याची माहिती हाती आली आहे.
“औरंगाबाद जिल्ह्यातून शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांना साईपालख्या घेवून येण्यासाठी हा सडे-शिंगवे शिवरस्ता अतिशय महत्वाचा आहे.मात्र मागील काही वर्षापासून या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे साईभक्तांना व पंचक्रोशीतील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता आता त्यातून युक्ती मिळणार आहे”-ना.आशुतोष काळे अध्यक्ष साई संस्थान शिर्डी.
या रस्त्याला ना. आशुतोष काळे यांच्या निधीतून १० लाख रुपये निधी मिळाला आहे.या निधीतून मारुती मंदिर ते चांगदेव बारहाते घर रस्ता (सडे-शिंगवे शिवरस्ता) मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.काळे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.तसेच यावेळी सडे येथे २४ लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या रावसाहेब बारहाते घर ते युवराज देठे घर रस्ता मजबुतीकरण कामाचे देखील भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
औरंगाबाद जिल्ह्यातून शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांना साईपालख्या घेवून येण्यासाठी हा सडे-शिंगवे शिवरस्ता अतिशय महत्वाचा आहे.मात्र मागील काही वर्षापासून या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे साईभक्तांना व पंचक्रोशीतील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.मतदार संघाचा लोकप्रतिनिधी व साईबाबा संस्थांनचे अध्यक्ष या नात्याने ना.काळे यांनी या रस्त्याचा प्रश्न धसास लावला आहे.हा रस्ता लवकरच डांबरीकरण होणार आहे.त्यासाठी प्रजीमाच्या निकषानुसार प्रस्ताव दाखल केला असून लवकरच निधीची तरतूद होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.त्यामुळे वारी,कान्हेगाव,सडे,शिंगवे,रुई,कोहकी,कोकमठाण आदी गावातील नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने मोठा फायदा होणार आहे.
सदर प्रसंगी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम,पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,रमेश वाकचौरे,रावसाहेब बारहाते,गणपत बारहाते,विजय बारहाते,अशोक बारहाते,सुनील बारहाते,गणेश बारहाते,रामभाऊ बारहाते,चांगदेव बारहाते,शशिकांत बारहाते,ज्ञानदेव बारहाते आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.