कोपरगाव तालुका
मुद्रण व्यवसायात नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मुद्रण व्यवसायाला ६२५ वर्षाची परंपरा असून काळानुसार त्यात अमुलाग्र बदल होत असून नवीन पिढीने अत्याधुनिक व अद्यावत तंत्रज्ञान हस्तगत करण्याची आवश्यकता असून त्यासाठी शासन दरबारी तसेच विविध उद्योग समुहात उपलब्ध असलेल्या यंत्रसामुग्रीचा अभ्यास करण्याची आवश्यकता ह.भ.प. दशरथ आप्पाजी उकिर्डे महाराज यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली आहे.
यावेळी नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली यात अध्यक्ष संजय-कोपटे, कार्याध्यक्ष-भागीनाथ उकीर्डे, उपाध्यक्ष-गणेश कानडे, विजय-दाभाडे, ज्ञानेश्वर-जाधव, सचिव संजीव-देशपांडे, सहसचिव-राजेंद्र मंडलिक, खजिनदार-मोहन उकीर्डे, सहखजिनदार-संतोष माळी, संघटक-सतिष जाधव, महेश नागरे, प्रसिध्दीप्रमुख-संदीप जोशी, निलेश काले, महिला प्रतिनिधी-चारूशील शहा, कामगार प्रतिनिधी-बाळासाहेब सोळसे, विनायक सोनवणे यांचा समावेश आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
जागतिक मुद्रण दिनानिमित्त या व्यवसायाचे जनक युहानेस गुटेनबर्ग यांच्या यांच्या जयंतीचे कोपरगाव शहरात कोपरगांव तालुका मुद्रक संघाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मुद्रक चंद्रकांत नागरे होते.
याप्रसंगी महाराष्ट्र मुद्रण परीषदेचे सदस्य अशोक खांबेकर, कोपरगांव तालुका विद्यार्थी सहाय्यक समितीचे अध्यक्ष हिरालाल महानुभाव, ज्येष्ठ विकास शहा, चंद्रकांत शिंदे काका, दिलीप उकीर्डे, बाळासाहेब चिखले,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि,, राज्यात ४० हजार मुद्रणालय असून त्यापैकी २० टक्के मुद्रणालय हे ग्रामीण भागात आहे. ग्रामीण भागातील मुद्रकांना नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी संघाच्या वतीने विविध उपक्रम आयोजित करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
यावेळी २०२० ते २०२२ च्या नुतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
याप्रसंगी महाराष्ट्र मुद्रण परीषदेचे सदस्य अशोक खांबेकर, कोपरगांव तालुका विद्यार्थी सहाय्यक समितीचे अध्यक्ष हिरालाल महानुभाव, ज्येष्ठ विकास शहा, चंद्रकांत शिंदे काका, दिलीप उकीर्डे, बाळासाहेब चिखले, यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी कोपरगांव तालुक्यातील मुद्रक, मनोज निलक, पवन चिखले, गोरक्षनाथ कानडे, मनोज शिंदे, राजेंद्र कोपटे, प्रसाद नरोडे, सुंदर लकारे, प्रसाद उकिर्डे, मनोज कानडे, सतिष ठाणगे, सुभाष पंडोरे, किरण माळी, सुभाष जाधव, निकम सर, राजेंद्र संत, नाना महाले, नवनाथ सोनवणे, निलेश लचुरे, संदीप शिनारे, सागर सोनवणे, राहूल धिवर, किशोर लचके, आसिफ शेख, प्रसाद चव्हाण, सोमनाथ कातोरे, दत्तु म्हस्के, पप्पू पंजाबी, लक्ष्मण वाघ, सोमनाथ शिंदे, बाळासाहेब आढाव, विकास आंबोरे, राजू होले, किरण होले, सिताराम जावळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.उपस्थितांचे आभार सतिष जाधव यांनी मानले.