कोपरगाव तालुका
..या महिला आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श मुखाध्यापक पुरस्कार कोपरगाव येथील डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाच्या प्राचार्या मंजुषा सुरवसे यांना नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी पद्मश्री पुरस्कार प्राप्त बीजमाता राहीबाई पोपेरे,राजेंद्र जाधव माजी.व्हाईस चेअरमन महानंदा दूध संघ मुंबई,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,दौलतराव जाधव,वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसुंदर,संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ डफाळ व संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थितीत होते.
मंजुषा सुरवसे ह्या मागील पाच वर्षांपासून रयत शिक्षण संस्थेच्या डॉ.सी.एम. मेहता कन्या विद्यालयाच्या प्राचार्या म्हणून काम करत असून गेली बत्तीस वर्षे अध्यापनाचे काम करत आहे.शाळा विकास व विद्यार्थिनींचे हीत समोर ठेवून त्या कार्य करत आहे.त्यांनी आपल्या कार्यकाळात विद्यालयाची संरक्षक भिंत,वॉटर पुरीफायर,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,वर्गखोल्यांमध्ये फॅन इत्यादी विकासाची कामे तसेच एल.सी.डी. प्रोजेक्टरच्या माध्यमातून अध्यापनात आधुनिकता आणली आहे. त्यांच्या कार्यकाळात इयत्ता दहावी निकाल तसेच स्पर्धा परीक्षेत देखील विद्यालय चांगले यश मिळवत आहे.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व सदस्य,स्थानिक स्कुल कमिटी ,स्थानिक सल्लागार समिती,शाळा व्यवस्थापन समिती ,शिक्षक पालक संघ, पालक,सर्व सेवक व विद्यार्थिनी यांनी अभिनंदन केले आहे.