निधन वार्ता
अण्णासाहेब रोहमारे यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अमृत सहकारी दूध व्यावसायिक सहकारी संस्थेचे अध्यक्ष व गोदावरी-परजणे दूध संघाचे माजी संचालक अण्णासाहेब दगडू रोहमारे (वय-८२) यांचे नुकतेच कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात,पत्नी,दोन बहिणी तीन मुले असा परिवार आहे.
स्व.अण्णासाहेब रोहमारे हे या अत्यन्त कडक शिस्तीचे व सत्य वचनी स्वभावाचे म्हणून पोहेगाव व कोपरगाव परिसरात प्रसिद्ध होते.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.अण्णासाहेब रोहमारे यांनी स्व.नामदेवराव परजणे व माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्यात शिर्डी पोट निवडणुकीत आ.राधाकृष्ण विखे यांना मदत करण्यावरून झालेल्या वादात उडी घेऊन स्व.नामदेवराव परजणे यांना मदत केली होती.व शेवटपर्यंत त्यांना साथ दिली होती.ते स्व.नामदेवराव परजणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जात.या वादात एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर शंभरावर गुन्हे दाखल झाले होते.अनेकांना दिवाळी सण कारागृहात साजरा करावा लागला होता.त्यातून गोदावरी दूध संघ स्व.नामदेवराव परजणे यांनी माजी मंत्री कोल्हे यांचेकडून लीलया काढून घेतला होता.व तो शेवटपर्यंत कायम ठेवला होता.त्यात स्व.रोहमारे यांची मोलाची भूमिका होती.
त्यांच्या निधनाबद्दल माजी मंत्री राधाकृष्ण विखे, कोपरगावचे आ.आशुतोष काळे,गोदावरी परजणे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व संचालक सचिन रोहमारे आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.