निवडणूक
साडे चारशे कोटींचे कर्ज करणारा लेखा परीक्षक कसा? रघुनाथ दादांचा सवाल
न्यूजसेवा
श्रीरामपूर-(प्रतिनिधी)
साडे चारशे कोटींचे कर्ज करणारा लेखा परीक्षक कसा? रघुनाथ दादांचा सवालश्रीरामपूरात अशोक सहकारी साखर कारखान्याच्या पस्तीस वर्षात माजी.आ.मुरकुटे यांचे काम चांगले असते तर ४५० कोटीचे कर्ज झालेच कसे व तूम्ही कशाचे लेखा परीक्षक आहे असा तिखट सवाल केला असून जिल्ह्यातील सर्व साखर कारखाण्यापेक्षा सर्वात जास्त भाव देऊ असे आश्वासन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी दिले आहे
“शेतकरी संघटनेचे माजी प्रदेश उपाध्यक्ष स्व.बबनराव काळे यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळविण्यासाठी निस्वार्थ लढा केला.त्या लढ्याला आगामी काळात नेण्यासाठी अशोक कारखान्याचा लढा हाती घेतला असून त्यासाठी सभासद नसताना आपण ही लढाई घेतली आहे.मात्र सत्ताधारी अशोक कारखान्याच्या विकासाबाबत नफ्या-तोट्याबाबत बोलणे सोडून ही मंडळी कोटुंबिक कलह दाखवून जनतेचे लक्ष भरकटत आहे”-अड.अजित काळे,उपाध्यक्ष शेतकरी संघटना.
श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी कामधेनू म्हणून महत्वपूर्ण असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक येत्या रविवार दि.१६ जानेवारी रोजी संपन्न होत असून त्यासाठी सत्ताधारी माजी आ. मुरकुटे गटाच्या विरुद्ध शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध मोठे आव्हान निर्माण केले आहे.त्यामुळे प्रचार सभांना वेग आला आहे.त्यासाठी नुकतेच टाकळी भान येथे सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास प्रचार सभा आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रोहिदास बोडखे हे होते.
सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथ दादा पाटील,उपाध्यक्ष अड.अजित काळे,नगर जिल्हा खजिनदार रुपेंद्र काले,श्रीरामपूरचे क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखिले,राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक,श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ.वंदना मुरकुटे,पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते,सुरेश ताके,श्रीरामपूर नगरपरिषद अध्यक्षा अनुराधा आदिक,अड.सर्जेराव कापसे,सुरेश ताके,अर्चना उंडे,अर्चना पानसरे,विष्णू खंडांगळे,राजेंद्र पानसरे,काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र कोकणे,आदी मान्यवरांसह बहुसंख्य शेतकरी सभासद उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”शेतकरी संघटनेने त्यांना पराभवाचे तारे चमकू लागल्याने ते बाष्कळ बडबडू लागले आहे.लोकशाही ही केवळ नखाला शाई लावण्यापूरती नाही.शेतकरी संघटनेने ५६० प्रतिटन भाव देणार नाही म्हणणारे साखर सम्राट टाळ्यावर आणले आहे.झोन बंदी उठवली आहे.स्वतःची संपत्ती वाढविण्याचे एक कलमी काम साखर कारखानदारांनी सुरू केले आहे.इतर राज्यात प्रतिटन ३६०० चा गुजरात उसाला भाव चार हजारांच्या वर देत आहे.मात्र मुरकुटे केवळ आपल्या बँकेत भांडवल वाढविण्याचे काम करून मुंबईतील उद्योजकांना देण्याचे षडयंत्र केले जात आहे.,आम्ही सत्तेत आलो तर ३५०० पर्यंत देऊ. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा यांनी सी रंगराजन समितीपुढे गाऱ्हाणे मांडून न्याय देण्याचा प्रयत्न केला.सभासद याकडे लक्ष देत नाही म्हणून ही मंडळी बेशिस्त व बेताल झाली आहे.उसाची कांडी नाही ही वर्तमानात सोन्याची कांडी झाली आहे.यातून प्रत्येक घरावर सोन्याची कौले बसवता येतील इतका पैसा मिळू शकतो.उसापासून काय होत नाही.पेट्रोल डिझल ऐवजी उसातून खनिज तेल मिळवले तर सृष्टीचा ऱ्हास टळू शकतो.मात्र काखान्यातील प्रस्थापिताना हाकलून द्यावे लागेल.माजी.आ.मुरकुटे यांचे काम चांगले असते तर ४५० कोटीचे कर्ज झालेच कसे व तूम्हि कशाचे लेखा परीक्षक आहे असा तिखट सवाल केला असून जिल्ह्यातील सर्व साखर कारखाण्यापेक्षा सर्वात जास्त भाव देऊ असे आश्वासन दिले आहे.आजी मंत्री गोविंदराव आदिक यांना कृषक समाजाबद्दल विशेष प्रेम होते.त्यांचे आपले चांगले संबंध होते.आगामी काळात शेतकरी संघटना तुमच्या सोबत राहीन असे सांगून उपस्थित सभासदांना “कपबशी”ला शिक्का मारण्याचे आवाहन शेवटी केले आहे.
सदर प्रसंगी अड.अजित काळे यांनी,”शेतकरी संघटनेचे माजी प्रदेश उपाध्यक्ष स्व.बबनराव काळे यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळविण्यासाठी निस्वार्थ लढा केला.त्या लढ्याला आगामी काळात नेण्यासाठी अशोक कारखान्याचा लढा हाती घेतला असून त्यासाठी सभासद नसताना आपण ही लढाई घेतली आहे.मात्र सत्ताधारी अशोक कारखान्याच्या विकासाबाबत नफ्या-तोट्याबाबत बोलणे सोडून ही मंडळी कोटुंबिक कलह दाखवून जनतेचे लक्ष भरकटत आहे.मात्र जनता सत्ताधाऱ्यांच्या तमाशाला भुलणार नाही.ऊसतोडणी वाहतून सन-२०१६ ला ९०० रुपये दाखवता आज का कमी आहे.अशोकची गाळप क्षमता केवळ २८०० प्रतिटन असताना देखभाल दुरुस्ती खर्च तब्बल ३३ कोटी तर साडेसात हजार टन क्षमता असलेल्या संगमनेर कारखान्याचा खर्च केवळ ०५ कोटी आहे.मग हा पैसा कोठे जातो हा सवाल करायला नको का? कारखान्याची गाळप क्षमता वाढवली असती तर देखभाल दुरुस्ती कमी झाली असती. मात्र त्यावर बोलायचे सोडून सासरा-सूनेचे,बाप-मुलाचे भांडण कथाकथन करून सभासदांची करमणूक एका तमासगीराकडून सुरू आहे.त्याला सभासद भुलणार नाही हे समजल्याने यांची मती भ्रष्ट झाल्याने असंबद्ध बडबड सुरू असून हें पराभव होत असल्याचे त्यांचे प्रमुख लक्षण दिसून येत आहे.आदिक मुरकुटे भांडण हा कारखाना निवडणुकीचा विषय होऊ शकत नाही.मात्र ज्यांना दिवसा पराभवाचे तारे दिवसा चमकू लागले त्यांना मूळ विषय भरकटवणे सोयीचे वाटत असते.हेच लक्ष प्रस्थापितांत दिसत आहे.आम्ही म्हणून आम्ही २७०० रुपये प्रति टन हा सांगत आहे मात्र ही मंडळी त्यावर बोलत नाही.
सदर प्रसंगी प्रास्तविक विष्णुपंत खंडांगळे यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक,शिवाजीराव नांदखिले,पुणे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते,श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती डॉ.वंदना मुरकुटे,नगराध्यक्षा अनुराधा आदिक,जितेंद्र भोसले,ज्ञानेश्वर मुरकुटे,रुपेंद्र काले,अड.सर्जेराव कापसे आदींनी केले आहे.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जयकर मगर यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजेंद्र कोकणे यांनी मानले आहे