कोपरगाव तालुका
ढाकणे याचा योगासन स्पर्धेत मोठा सन्मान
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थी प्रज्वल ढाकणे याला भुवनेश्वर (ओडिसा) येथे नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय योगासन स्पर्धेत (मुले व मुली) सिल्वर मेडल मिळाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी दिली आहे.
के.आय.आय.टी.विद्यापीठ,भुवनेश्वर,ओरिसा या ठिकाणी संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मुलांनी सांघिक गटामध्ये अखिल भारतीय योगासन स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर रौप्य पदक मिळाले. या संघात के.जे.सोमय्या महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रज्वल ढाकणे यांनी उत्कृष्ट अशी कामगिरी करून पदक मिळवून देण्यात वाटा उचलला. प्रज्वल याची बेंगलोर येथे होणाऱ्या खेलो इंडिया २०२१-२२ या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या स्पर्धेत एकूण १४० विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता. यापैकी आठ संघ खेलो इंडिया साठी पात्र ठरले आहे.२५ वर्षांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत पदक प्राप्त झाले आहे.
प्रज्वल ठाकणे याने मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.अशोकराव रोहमारे, सचिव अॅड.संजिव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे,प्राचार्य डॉ. बी.एस.यादव, मार्गदर्शक डॉ.सुनिल कुटे महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.