जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांवर लाठी हल्ला,..या समितीचे कार्यकर्ते निर्दोष

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राहाता तालुक्यातील खडकेवाके ग्रामपंचायत हद्दीत फळ प्रक्रिया उद्योगाच्या उदघाटनास येत असलेले तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे सभेत बसलेल्या शेतकऱ्यांना बसण्यास हरकत घेऊन पोलिसांना लाठी हल्ल्याचा आदेश देऊन आपण नामानिराळे राहणाऱ्या तत्कालीन कृषी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी निळवंडे कालवा कृती समितीच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांवर अमानुष हल्ला करून बेकायदा गुन्हे दाखल केलेल्या खटल्याचा निकाल नुकताच कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जाहीर केला असून त्यातील प्रमुख आरोपी पत्रकार नानासाहेब जवरे,नानासाहेब रेवजी शेळके,चंद्रकांत दशरथ दिघे,विठ्ठल रावसाहेब घोरपडे, गंगाधर शंकर गमे यांना निर्दोष मुक्त केले आहे.या निर्णयाचे निळवंडे कालवा कृती समितीने जल्लोषात स्वागत केले आहे.

“निळवंडे कालव्यांच्या कामास कृत्रिम अडथळा निर्माण करून शेतकऱ्यांना या पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या प्रवरा काठच्या नेत्यांनी पाणी तर दिले नाहीच पण पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठ्या काठ्या चालवून आपली शेतकऱ्या प्रती असलेली संवेदना दाखवून दिली आहे.पण न्यायालयाने या शेतकऱ्यांना निर्दोष करून न्याय दिला आहे”-रुपेंद्र काले, अध्यक्ष निळवंडे कालवा कृती समिती,नगर,नाशिक.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,तत्कालीन कृषी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी राहाता तालुक्यातील खडकेवाके ग्रामपंचायत हद्दीत पेरू फळ प्रक्रिया उद्योगाचे उदघाटन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते आयोजित केले होते.हा कार्यक्रम जाणीवपूर्वक दुष्काळी ठेवलेल्या निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात प्रस्तावित होता.त्यामुळे या सभेत मुख्यमंत्री निळवंडे कालव्यांच्या पन्नास वर्षे जाणीवपूर्वक प्रवरा खोऱ्यातील नेत्यांनी प्रलंबित ठेवलेल्या कामाबाबत काय घोषणा करतात हे ऐकण्याची या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची उत्कंठा होती.त्यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने सभामंडपात उपस्थित होते.
मात्र त्यांना बसण्यास तत्कालीन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे व त्यांचे पुत्र सुजय विखे यांनी जोरदार हरकत घेतली.व शेतकऱ्यांना तेथून हटविण्यासाठी तत्कालीन शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील,राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश बेंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांना आदेश देऊन शेतकऱ्यांवर लाठी हल्ला करण्यास भाग पाडले होते.व त्याचा गुन्हा राहाता पोलीस ठाण्यात दाखल केला होता.त्यात आरोपी म्हणून पत्रकार नानासाहेब जवरे,रा.जवळके,ता.कोपरगाव,नानासाहेब रेवजी शेळके,आडगाव बु.ता.राहाता,चंद्रकांत दशरथ दिघे,वेस,ता.कोपरगाव,विठ्ठल रावसाहेब घोरपडे,चिंचोली ता.संगमनेर, गंगाधर शंकर गमे रा.केलवड ता.राहाता आदींवर भा.द.वि.कलम १५३,१४४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.त्या संबंधी हा खटला आधी पाच वर्षे राहाता येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे समोर चालला व दोन वर्षांपूर्वी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर वर्ग केला होता.दरम्यान राज्यात २०१४ साली सत्तांतर होऊन भाजप सरकार सत्तेत आले व त्यांनी मागील काळात सरकारी नुकसान न झालेले राजकीय खटले मागे घेण्याची घोषणा केली होती.त्या नुसार या संबंधी ही नस्ती जिल्हा पोलिस अधीक्षक व जिल्हाधिकारी मार्गे दोन वेळा मंत्रालयात दोन वेळेस खटला मागे घेण्यासाठी पाठविण्यात आली होती मात्र दोन्ही वेळेस संबंधित मदांध मंत्र्याने आपला सत्तेचा दुरुपयोग करत मागे पाठवली होती.२०१९ साली राज्यात सत्तातंर होऊन महाविकास आघाडी सरकार सत्तेत विराजमान झाल्यावरही त्याचा निळवंडे कालवा कृती समितीस अनुभव आला होता.त्यामुळे अखेर हा शेतकऱ्यांवर लादलेला खटला तब्बल साडेसात वर्ष न्यायालयात अडकला होता.

मात्र वर्तमानात कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर कालवा समितीची व शेतकऱ्यांची बाजू कोपरगाव येथील प्रसिद्ध वकील व कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष अड.जयंत जोशी यांनी जोरदारपणे मांडली होती.व शेतकरी बसलेले असताना केवळ राजकीय नेत्यांच्या अहंकार आडवा आल्याने उपस्थित शेतकऱ्यांवर हा हल्ला पोलीस बळाचा व उपस्थित अधिकाऱ्यांचा वापर करून दि.१० ऑगष्ट २०१४ रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी जाणूनबुजून घडविण्यात आला होता असा दावा करण्यात आला होता.व सदर ठिकाणी ना मुख्यमंत्री आले होते,ना कार्यक्रम सुरू झाला होता.ना शेतकऱ्यांनी घोषणा दिल्या होत्या.ना सरकारी कामात अडथळा आणला होता.तरीही शांत बसलेल्या शेतकऱ्यांवर हा लाठी हल्ला चढवला होता.त्यात अनेक शेतकरी जखमी झाले होते.या घटनेनंतर घटनास्थळी आलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व तत्कालीन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे या उर्मट मंत्र्याने माध्यम प्रतिनिधीसमोर जाहीर माफी मागितली होती.हा हल्ला विविध वृत्त वाहिन्यांचे व मुद्रित माध्यमांच्या प्रतिनिधी समोर चढविण्यात आला होता.त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांत असंतोष भडकला होता.दोन ते तीन दिवस या रक्षा बंधनाचा दिवशी शेतकऱ्यावर पोलिसांनी केलेल्या अमानुष्य हल्यावर चर्चा सुरू होत्या.विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे या घटनेचा निषेध व्यक्त केला होता.तत्कालीन भाजप व शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी राज्यभर या घटनेचा निषेध व्यक्त केला होता.

या खटल्याचा निकाल दि.६ जानेवारी पत्रकार दिनाचे दिवशी नुकताच कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.एस.एम.बोधनकर यांनी दिला असून सर्व पाचही कार्यकर्त्यांना निर्दोष मुक्त केले आहे.त्या बद्दल ऐत्याहसिक निकाल देणाऱ्या न्यायमूर्ती व या खटल्याची सुनावणी गेली साडेसात वर्ष कुठल्याही प्रलोभणाला बळी न पडता वकील संघाचे माजी अध्यक्ष अड.जयंत जोशी यांनी स्वतःहून चालवली त्यांचे निळवंडे कालवा कृती समितीने व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पेढे वाटून जोरदार स्वागत केले आहे.

सदर प्रसंगी बाबासाहेब गव्हाणे,सौरभ वसंतराव शेळके,विनायक मुरलीधर गायकवाड,राजेंद्र भाऊसाहेब,सोनवणे भाऊसाहेब दादा सोनवणे,सोपान थोरात,माधव गव्हाणे,आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी अड.जयंत जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही याचिका जनहितार्थ मोफत चालविल्याने व शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याने त्यांचा युवा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अड.अजित काळे,प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे,निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक नानासाहेब जवरे,बाबासाहेब गव्हाणे,अड.योगेश खालकर,विठ्ठल घोरपडे,राजेंद्र सोनवणे,गंगाधर गमे,माधव गव्हाणे,सोपान थोरात,सौरभ शेळके,आदी कार्यकर्त्यांनी हार,गुच्छ देऊन व पेढे भरवून अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close