कोपरगाव तालुका
चारशे ऐवजी केवळ दीडशे रुपयात सॉर्टेड सिमेन-कोपरगाव तालुक्यातील उपक्रम
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
माजी केंद्रीय मंत्री पद्मभुषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या पाचव्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघ व भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान ( बी.आय.एस.एल.डी. ) उरळीकांचन यांच्या संयुक्त विद्यमाने संघास दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांसाठी नवीन वर्षात दि. १ जानेवारी ते ३१ मार्च २०२२ या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी चारशे रुपयांऐवजी केवळ एकशे पन्नास रुपये सवलतीच्या दरात सॉर्टेड सिमेन उपलब्ध करुन देण्याचा महत्वपूर्ण उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमाचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी केले आहे.
“गोदावरी दूध संघ व बायफ संस्थेच्यावतीने यापूर्वी अत्याधुनिक डिजीटल कृत्रिमरेतन गन मशिन्स कार्यक्षेत्रातील पशुधन विकास केंद्रांना वाटप करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रायोगिक तत्वावर काही केंद्रांना गन मशिन्स उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. या केंद्रातील उपयुक्तता विचारात घेवून नंतर कार्यक्षेत्रातील सर्वच पशुधन विकास केंद्रांना या गन मशीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे”-राजेश पराजणे,अध्यक्ष,गोदावरी-परजणे दूध संघ.
गोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघास दुधाचा नियमित पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांसाठी संघाने विविध उपक्रम हाती घेतले असून त्याचाच एक भाग म्हणून नवीन वर्षात जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांसाठी ४०० रुपये किमतीचे सॉर्टेड सिमेन केवळ १५० रुपयात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.प्रती सॉर्टेड सिमेन सोबत एक किलो खनिज मिश्रण व जंतनाशक गोळ्याही विनामूल्य देण्यात येणार असून असा अभिनव उपक्रम राबविणारा गोदावरी दूध संघ हा एकमेव संघ आहे. या उपक्रमाद्वारे दूध उत्पादन वाढीसाठी चांगला हातभार लागणार असून सर्वसामान्य दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या अत्याधुनिक सॉर्टेड सिमेनचा प्रयोग सर्वप्रथम गोदावरी दूध संघाच्या कार्यक्षेत्रात राबविला गेला. सॉर्टेड सिमेनचा यापूर्वीचा वापर बघता ९३ टक्क्यापर्यंत कालवडी जन्माला आलेल्या आहेत,या जन्मलेल्या कालवडीं पैकी अनेक कालवडी दुधावर आलेल्या असून त्यांची दूध देण्याची क्षमता सुमारे २७ लिटरहून अधिक आहे.
गोदावरी दूध संघ व बायफ संस्थेच्यावतीने यापूर्वी अत्याधुनिक डिजीटल कृत्रिमरेतन गन मशिन्स कार्यक्षेत्रातील पशुधन विकास केंद्रांना वाटप करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रायोगिक तत्वावर काही केंद्रांना गन मशिन्स उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. या केंद्रातील उपयुक्तता विचारात घेवून नंतर कार्यक्षेत्रातील सर्वच पशुधन विकास केंद्रांना या गन मशीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.या यंत्रणेमुळे कृत्रिमरेतन प्रक्रिया अतिशय सुलभ व खात्रीशीर होणार असल्याने कृत्रिमरेतन तंत्रज्ञांचीही कामे यामुळे सोपी होणार आहेत.ही अत्याधुनिक यंत्रणा गोदावरी दूध संघाच्या कार्यक्षेत्रामध्ये सर्वप्रथम कार्यान्वित करण्यात आलेली आहे. दुग्ध व्यवसायामध्ये दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान विकसीत होत असून गोदावरी दूध संघाने अशा नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन संघाच्या कामकाजात अमुलाग्र बदल बदल घडवून आणला असल्याचे सांगून नवीन वर्षात दि. १ जानेवारी ते ३१ मार्च २०२२ या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी चारशे रुपयां ऐवजी केवळ एकशे पन्नास रुपये सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सॉर्टेड सिमेनचा दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही शेवटी परजणे यांनी केले आहे.