कोपरगाव तालुका
…या गावात एकाचा सर्प दंशाने झाला मृत्यू
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव ग्रामपंचायत हद्दीत आपल्या बकऱ्या चारण्यास घेऊन गेले असता सुभाष कारभारी भागवत यांना सर्पदंश झाल्याने त्यांना उपचारार्थ औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यात यश आले नाही.त्यांच्या मृत्यू बाबत औरंगाबाद येथे शून्य क्रमांकाने अकस्मात मृत्युची नोंद करून ती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पवार हे करीत आहेत.