न्यायिक वृत्त
कोपरगाव तालुक्यातील महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केले,तीन आरोपी निर्दोष
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील रहिवासी असलेली महिला सारिका हुसळे हिला नळावरील पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या कारणावरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी राजेंद्र भाऊराव हुसळे (वय-३५) यांनी दाखल झालेल्या गुन्ह्याची सुनावणी नुकतीच संपन्न होऊन त्यात कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने यातील आरोपी संतोष कचरू हुसळे (वय-३५),सविता संतोष हुसळे (वय-३१),सत्यभामा कचरू हुसळे (वय-५५) या तिघांना न्यायालयाने नुकतेच निर्दोष मुक्त केले आहे.
सार्वजनिक नळावर पिण्याचे पाणी भरण्याच्या नम्बरवरून मयत महिलेचे व आरोपींचे आपापसात भांडणे झाली होती.त्यात आरोपी सविता संतोष हुसळे व सत्यभामा हुसळे यांनी त्यांना शिविगाळ व दमदाटी करून मारहाण केली होती.त्या वरून पोलीस ठाण्यात तक्रार देतो असे म्हटल्याने फिर्यादी महिलेने भीतीने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली होती.त्या खटल्याचा निकाल जाहीर होऊन जिल्हा न्यायालयाने आरोपी निर्दोष मुक्त केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी राजेंद्र हुसळे यांची पत्नी सारिका राजेंद्र हुसळे (वय-३२) यांचे कोपरगाव तालुक्यातील हुसळे वस्ती येथे दि.०७ सप्टेंबर २०१६ रोजी दुपारी ०२.३० वाजता सार्वजनिक नळावर पिण्याचे पाणी भरण्याच्या कारणावरून,नम्बरवरून आपापसात भांडणे झाली होती.त्यात आरोपी सविता संतोष हुसळे व सत्यभामा हुसळे यांनी त्यांना शिविगाळ व दमदाटी करून मारहाण केली होती.त्या नंतर दुसऱ्या दिवशी आरोपी राजेंद्र हुसळे व त्याची पत्नी सविता हुसळे यांनी आदल्या दिवशी पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाची कुरापत काढून मयत सारिका राजेंद्र हुसळे हिला,तू,काल माझ्या पत्नीचा अपमान केला आहे.आता आम्ही पोलीस ठाण्यात जाऊन तुझ्या विरुद्ध तक्रार देतो व तुझी चांगलीच जिरवतो” असा दम दिला व वारंवार शिवीगाळ करून भांडण काढून मानसिक त्रास देऊन तिला स्वतःचे अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत केले आहे.असा गुन्हा फिर्यादी राजेंद्र हुसळे यांनी त्याच गावातील आरोपी संतोष कचरू हुसळे (वय-३५),सविता संतोष हुसळे (वय-३१),सत्यभामा कचरू हुसळे (वय-५५) या तिघांवर भा.द.वि.कलम ३०६,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला होता.
त्या बाबत तालुका पोलीस ठाण्याचे चौकशी अधिकारी पोलिस निरीक्षक शहाजी नरसुडे यांनी चौकशी करून या बाबत दोषारोपाचा अंतिम अहवाल कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर सन-२०१७ साली दाखल केला होता.त्या नुसार या घटनेत एकूण अकरा साक्षिदार तपासण्यात आले होते.त्याचे जाबजबाब व सुनावणी अकरा महिने सुरु होती.
या बाबत फिर्यादी व आरोपी पक्षांची दोन्हीची बाजू न्यायालयाने ऐकून घेतली त्यात आरोपीच्या वतीने अड्.एम.पी.येवले यांनी साक्षीदारांच्या जबाबात दिलेल्या विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या होती.तर उलट तपासणीत साक्षीदारांकडून घटनेव्यतिरिक्त सत्य परिस्थिती वदवून घेतली होती.या सर्वांचा विचार करून जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.एम.एस.बोधनकर यांनी तीनही आरोपीनां निर्दोष मुक्त केले आहे.फिर्यादीच्या वतीने अड्.एस.एम.गुजर यांनी काम पाहिले होते.