निवडणूक
सेना संपर्क प्रमुख दळवी यांची कोपरगावातील बैठक किती फलद्रुप होईल?
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नगरपालीका,जिल्हा परिषद,पंचायत समिति,ग्रामपंचायतं,आगामी निवडणुकीची पुर्व तयारी म्हणुन कोपरगाव विधानसभा नवनियुक्त संर्पकप्रमुख उदय दळवी यांनी आगामी कोपरगाव नगरपरिषद,जिल्हा परिषद,बाजार समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघातील परिस्थिती जाणुन घेण्यासाठी शिवसेनेच्या विविध गटांची स्वतंत्र सैनिकांची बैठक नुकतीच घेतली आहे.मात्र ही बैठक किती फलद्रुप होणार या बाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
आधीच सेनेत सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक प्रस्थापितांना थैलीच्या लोभातून प्रवेश देऊन स्थानिक शिवसेनेचा गळा कापलेला आहे.त्यांनी बिन बोभाट सेनेच्या या पूर्वी एकनिष्ठ (?) गणले गेलेले मान्यवर आपल्या कळपात सामील करून घेऊन शोले चित्रपटातील जेलरसारखी अवस्था करून घेतली आहे.अर्धे सैनिक पश्चिम गडावरील नेत्याने आपले चंबू गबाळ घेऊन जाताना गुंडाळून नेले तर उरलेले ईशान्य गडावरील महिला नेत्याबरोबर सामील झाले आहे.उरले ते विविध गटात विखुरले आहेंत.त्यामुळे आता किती जण खऱ्या व मूळ सेनेत राहतील हा संशोधनाचा विषय आहे.या पार्श्वभूमीवर हा दौरा किती फलद्रुप होईल हा संशोधनाचा विषय आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघात काँग्रेस अस्तंगत झाल्यासारखी दिसत आहे तिला डुबविण्यात स्वपक्षीय वरिष्ठ गणले गेलेले नेतेच कारणीभूत होताना दुर्दैवाने दिसत आहे तर याउलट राष्ट्रवादी प्रबळ होताना दिसत आहे.शिवसेनेची ताकत राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या विरुद्ध उभी रहात असताना दिसत असली तरी आज मात्र हा पक्ष दुर्दैवाने त्यांच्याच दावणीला बांधला जाताना दिसत आहे.वर्तमानात खासदार व पक्ष प्रतोद संजय राऊत ज्या तऱ्हेने अन्य पक्षीय नेत्यांच्या पालख्या वाहताना व खुर्च्या उचलताना दिसत आहे या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत,आमदार,खासदार आणि पदाधिकाऱ्यांत मोठी नाराजी आहे पण मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची ? हा खरा कळीचा मुद्दा आहे.राज्यात वर्तमानात ही स्थिती असताना कोपरगावात वेगळी स्थिती नाही.कोपरगावातही प्रस्थापितांनी पक्ष बदलून मतांची वाटमारी सुरू ठेवली आहे वरिष्ठ नेते त्यांच्याच खांद्याला खांदा लावून चालत असून त्यातून सेनेचे मोठे नुकसान होताना दिसत आहे.तरीही या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ‘एखाद्या हाड तोंडात घेऊन ते चावणाऱ्या मात्र त्यावून स्वतःचेच रक्त चाखणाऱ्या कुत्र्यासारखी’ झाली आहे.त्यामुळे तालुक्यात सेनेची मोठी हानी होताना दिसत आहे.(तशी ती मूळ वहाडणे भाजपचीही झाली आहे) या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा मानला जात असला तरी या पक्षाचे नेते या दौऱ्यातून या पक्षाच्या कार्यकर्त्याला किती आधार देतील हा संशोधनाचा विषय आहे.
बऱ्याच वेळा पक्षाच्या नेत्यांनीच निवडणुकीच्या तोंडावर खालच्या कार्यकर्यांच्या डोक्यांच्या संख्येचा वापर करून वरच्या पातळीवर निवडणूकपूर्व लिलाव केल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे.त्यामुळे खालच्या स्थानिक पातळीवर सेनेचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे.त्यामुळे सेनेत अस्वस्थता दिसून येत आहे.त्यातून मग आपणच का या पक्षाची बांधिलकी स्वीकारावी ? हा अटबट्याचा सवाल स्वतःला विचारीत आहे.त्यातून सेनेचे मोठे नुकसान होत आहे.ईशान्य गडावरील नेत्यांनी तर गत कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत शहर सेनेतील निवडक कार्यकर्त्यांना हेरून मासिक २५-३० हजारी मनसबदाऱ्या बहाल केल्या आहे मात्र अवघ्या पाच वर्षात उपयोगिता संपल्यावर त्यांना मागील रांगेत ढकलले आहे.त्यांची तोंडे वर्तमानात पाहण्यासारखी झाली आहेत.ज्या काँग्रेसी विचार धारेवर हा पक्ष वाढला त्यांच्याशी सोयरीक करून हा पक्ष स्वतःची आत्महत्या करणार की त्यातून उभारणार हे लवकरच कळणार आहे.मात्र पहिली शक्यताच अधिक दिसून येत आहे.
या आधीच पक्षात हौसे,नवसे आणि गवसे मोठ्या प्रमाणावर गोळा झाले आहे.त्यांनी आता भुईफोडाची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.काहींनी लोकसभा लोकप्रतिनिधींची मदत घेऊन व सेना स्थापन केलेल्या मात्र काही वर्षांपूर्वी अस्तंगत झालेल्या नेत्यांच्या जीवलगांच्या नावाचा वापर करून संस्था स्थापन केल्या आहेत.व त्या माध्यमातून आपले इसिप्त साध्य करून सेनेच्या मानगुटीवर वार करायला सुरुवात केली आहे.व पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बुडाखाली सुरुंग पेरायला सुरुवात केली आहे.त्यातून या पक्षावर पकड मिळवायची व त्यातून आपल्या “सोधा”(सोयरे-धायरे यांना उमेदवाऱ्या देण्याचे व स्थानिक स्वराज्य संस्थांवर पकड मिळविण्याचे षडयंत्र आखले आहे) पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्याचा छुपा अजेंडा रेटण्याचे ठरवलेले आहे.त्यामुळे या सेनेला मोठा धोका निर्माण झाला आहे.आधीच सेनेत सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक प्रस्थापितांना थैलीच्या लोभातून प्रवेश देऊन स्थानिक शिवसेनेचा केसाने गळा कापलेला आहे.त्यांनी बिन बोभाट सेनेच्या या पूर्वी एकनिष्ठ ? गणले गेलेले मान्यवर आपल्या कळपात सामील करून घेऊन शोले चित्रपटातील जेलरसारखी अवस्था करून घेतली आहे.अर्धे पश्चिम गडावरील नेत्याने आपले चंबू गबाळ घेऊन जाताना गुंडाळून नेले तर उरलेले ईशान्य गडावरील महिला नेत्याबरोबर सामील झाले आहे.उरले ते विविध गटात विखुरले आहेंत.त्यामुळे आता किती जण खऱ्या व मूळ सेनेत राहतील हा संशोधनाचा विषय आहे.कारण त्यांची अवस्था हि.श्रीमंत वऱ्हाडाबरोबर लग्नाला जरी बैल गाडीला जुंपून गेला तरी वऱ्हाडे पक्वान्न खातात आणि त्याच्या नशिबी आणि वाट्याला कडबाच येतो अशी झाली आहे.वरिष्ठ नेत्यांनी जरी सेनेला साखर कारखानदारांच्या पंक्तीला बसवले तरी सामान्य शिवसैनिकांच्या पाचवीला उपेक्षाच आणि उपेक्षाच येणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही.कारण कांजी कितीही घुसळली तरी त्यातून लोणी निघण्याची शक्यता धुसरच. मृगजळाची तळी दुरूनच पाहावीत नाही तरी मृगजळाच्या पाण्याने भात आणि केळी थोडीच लावता येणार आहे ? तशी राष्ट्रवादीची जरी सेनेने संगत केली तरी परिणाम शिवसेनेची उपेक्षा ठरलेली आहेच.’पहुरणी’ नावाच्या किड्याने जर गाभण गुराचे स्तन चोखले तर ते पुढे दूध देत नाही.तशीच अवस्था भविष्यात राष्ट्रवादीशी संग केल्याने शिवसेनेची होण्याची शक्यता अधिक.
दरम्यान पक्षाने शहरात ज्यांना निष्ठेच्या बळावर जिह्यातील प्रमुख पद बहाल केले त्यांनी तर या पक्षाला सावरण्याचा प्रयत्न करावा की नाही मात्र त्याही पातळीवर सपशेल सामसूम दिसत आहे हे विशेष!
या पार्श्वभूमीवर हा दौरा फार फलद्रुप होईल अशी शक्यता दिसत नाही.हाती दांडा आणि झेंडा घेऊन गेली चाळीस वर्षे सेनेचा जयजयकार करणाऱ्या सेनेच्या निष्ठावांनाना आजही न्याय मिळालेला नाही.या कडेही कोणाचेही लक्ष नाही.या फुटकळ सेनेच्या बळावर प्रस्थापितांचा सामना ते कसा करणार ? हा खरा प्रश्न आहे.आज मूळ भाजप व मूळ शिवसेना या दोन्ही पक्ष संघटना अखेरचे आचके देत असताना दिसत आहे.अशा प्रसंगी खरे तर या अपंग सेनानी एकत्र येऊन प्रस्थापितांना धडक देण्याची गरज आहे.मात्र याचा किती जण विचार करतील हा खरा औत्सुक्याचा विषय आहे.याला दिशा कोणी द्यायची हा वर्तमानातील कळीचा मुद्दा आहे.भलेही स्थानिक राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,किंवा माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे,गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,नगराध्यक्ष विजय वहाडणे,सेना,भाजपचे विखुरलेले गट यांना बरोबर घेण्याची वेळ आली तरी मुळीच कचरू नये.वर्तमानातील मूळ भाजप सेनेच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वकीयांच्या पाया पडण्यात मुळीच कमीपणा वाटू देऊ नये वर्तमानातील हीच खरी गरज आहे.ती ओळखली तो सुदिन!