गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात वाळूचोरी पकडली,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उप्पसा करण्यास जिल्हाधिकऱ्यानी प्रतिबंध केलेला असतानाही कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत टाकळी नाका कोपरगाव येथील वाळूचोर आरोपी रवींद्र बाबुराव वाघ याने दि.२६ नोव्हेंबर रोजी दुपारी १.१५ वाजेच्या सुमारास निळ्या रंगाच्या न्यू हॉलंड ३२३० या ट्रॅक्टर व चार चाकी ट्रॉलीच्या सहाय्याने एक ब्रास शासकीय वाळू अवैध रित्या घेऊन जाताना आढळून आल्याने त्याचे विरोधात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी पात्रात वाळू चोरांनी हैदोस घालून या पवित्र नदीतून मोठ्या प्रमाणावर नाशिक,नगर,औरंगाबाद आदी जिल्ह्यात बांधकाम व्यावसायिकांनी वाळूला सोन्याचे मोल आल्याने या नदीचे पात्र उजाड करून टाकले आहे.याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात तत्कालीन खा.काळे यांनी आपल्या समर्थकामार्फत याचिका दाखल होऊनही फारसा फरक पडला नव्हता न्यायालयाच्या आदेशाला वाळूचोरांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या होत्या.वर्तमानातही तोच अनुभव येत आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी पूर्वमुखी वहात असून ती वडगाव याठिकाणी तालुक्यात प्रवेश करते.त्या ठिकाणाहून ते वारी हद्दीतून ती राहाता तालुक्यात व पुढे औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करते.संबंधित ठिकाणी वाळू चोरांनी हैदोस घालून या पवित्र नदीतून मोठ्या प्रमाणावर नाशिक,नगर,औरंगाबाद आदी जिल्ह्यात बांधकाम व्यावसायिकांनी वाळूला सोन्याचे मोल आल्याने या नदीचे पात्र उजाड करून टाकले आहे.याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खण्डपीठात तत्कालीन खा.काळे यांनी आपल्या समर्थकामार्फत याचिका दाखल होऊनही फारसा फरक पडला नव्हता न्यायालयाच्या आदेशाला वाळूचोरांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या होत्या.अखेर उच्च न्यायालयाला याबाबत आपला आदेश मागे घ्यावा लागला होता.व सरकारचा बुडणारा महसूल पुन्हा वसूल करण्यास परवानगी द्यावी लागली होती.मागावुन तर पोलीस,महसूल अधिकारी,उरलेसुरले राजकीय नेते यांनीही या लुटीत सहभाग घेऊन आपले पवित्र काम करून जनतेची बांधिलकी (?) दाखवून दिली होती.आता फार थोडी वाळू या नदी पात्रात शिल्लक राहिली आहे.मात्र तिच्यावरही वाळूचोर डल्ला मारण्यास मागेपुढे पाहात नाही.
अशीच घटना नुकतीच कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत घडली असून कोपरगाव तालुका पोलिसांना कुंभारीत काही वाळूचोर वाळू चोरी करत असल्याची काही खबऱ्यांकडून कुणकुण लागली होती.त्यांनी त्या बाबत आपले गस्ती पथक पाठवले असता ते वृत्त खरे निघाले असून त्यांना त्या ठिकाणी एक न्यू हॉलंड कंपनीचा एक निळ्या रंगाचा ट्रॅक्टर हा चार चाकी ट्रॉलीच्या साहाय्याने एक ब्रास वाळू चोरी करताना कुंभारी येथील जिल्हा परिषद शाळेसमोर आढळून आला होता.त्यास पोलिसांनी रंगेहात ताब्यात घेतले असून त्यावर पोलीस कॉन्स्टेबल अंबादास रामनाथ वाघ यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी ट्रॅक्टर चालक रवींद्र वाघ याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान आरोपी मात्र घटनास्थळावरून फरार झाला आहे.या प्रकरणी पोलिसानी ०२ लाख रुपयांचा ट्रॅक्टर व १० हजार रुपये किमतीची वाळू असा ०२.१० लाखांचा अवैज जप्त केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.क्रं.४०२/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल एस.डी.बोठे हे करीत आहेत.