जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

शिर्डीत दिपावली निमित्त श्रीलक्ष्‍मीपुजनाचे आयोजन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्थेच्‍या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी रुढी परंपरेनुसार दिपावली श्रीलक्ष्‍मीपुजन उत्‍सव गुरुवार दिनांक ०४ नोव्‍हेंबर रोजी साजरा करण्‍यात येणार असून या वर्षी कोरोना व्‍हायरसच्‍या पार्श्‍वभूमीवर दिपावली श्रीलक्ष्‍मीपुजन उत्‍सव कोविड नियमांचे पालन करुन साजरा करण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दिली आहे.

“दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी रुढी परंपरेनुसार दिपावली श्रीलक्ष्‍मीपुजन उत्‍सव साजरात करण्‍यात येत असून कोरोना व्‍हायरसच्‍या पार्श्‍वभूमीवर या वर्षीचा दिपावली श्रीलक्ष्‍मीपुजन उत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍यात येणार आहे.दिपावली निमित्‍त दिनांक ०४ नोव्‍हेंबर रोजी सायंकाळी ०५.०० ते ०६.०० यावेळेत समाधी मंदिराच्‍या गाभा-यात लक्ष्‍मी पूजनाचा कार्यक्रम होणार आहे”-भाग्‍यश्री बानायत,मुख्य कार्यकारणी अधिकारी,श्री साईबाबा संस्थान शिर्डी.

श्रीमती बानायत म्‍हणाल्‍या,”दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी रुढी परंपरेनुसार दिपावली श्रीलक्ष्‍मीपुजन उत्‍सव साजरात करण्‍यात येत असून कोरोना व्‍हायरसच्‍या पार्श्‍वभूमीवर या वर्षीचा दिपावली श्रीलक्ष्‍मीपुजन उत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍यात येणार आहे.दिपावली निमित्‍त दिनांक ०४ नोव्‍हेंबर रोजी सायंकाळी ०५.०० ते ०६.०० यावेळेत समाधी मंदिराच्‍या गाभा-यात लक्ष्‍मी पूजनाचा कार्यक्रम होणार असून यावेळी श्रीगणेश पूजन,लक्ष्‍मी-कूबेर पूजन,सरस्‍वती पूजन व श्रींना धूप-नैवेद्य दाखविणे आदी कार्यक्रम होणार आहे. त्‍यामुळे सायंकाळी ०५ वाजता दर्शनरांग बंद करण्‍यात येईल. लक्ष्‍मी-कूबेर पूजन झाल्‍यानंतर सायंकाळी ०६.१५ वाजता श्रींची धुपारती होवुन सायं.६.४५ वाजता साईभक्‍तांसाठी दर्शनरांग सुरु करण्‍यात येईल. तर रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होणार आहे.
या दिपावली उत्‍सवानिमित्‍त शनि शिंगणापुर येथील गणेश शेटे,शनेश्‍वर डेकोरेर्टस यांच्‍यावतीने देणगी स्‍वरुपात विद्युत रोषणाई करण्‍यात येणार असून शिर्डी येथील साईभक्‍त विजय तुळशीराम कोते यांच्‍या देणगीतुन समाधी मंदिर,द्वारकामाई,चावडी व गुरूस्‍थान या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात येणार आहे.तसेच रतलाम येथील साईभक्‍त अनिल सिसोदिया,श्री साई सेवा समिती ट्रस्‍ट यांनी मंदिर परिसरात व प्रवेशव्‍दारावर आकर्षक रांगोळ्या काढणार आहे.
दिपावली श्रीलक्ष्‍मीपुजन उत्‍सवाचे सर्व कार्यक्रम कोविड नियमांचे पालन करुन करण्‍यात येणार असल्‍याचे सांगुन सर्व साईभक्‍तांना,शिर्डी ग्रामस्‍थांना व संस्‍थान कर्मचा-यांना दिपावलीच्‍या शुभेच्‍छा ही श्रीमती बानायात यांनी दिल्‍या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close