जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पशुसंवर्धन विकास

कोपरगावच्या बाजारात येणाऱ्या सर्वच जनावरांचे लसीकरण करा-आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील जनावरांचे बाजार सुरळीतपणे पुन्हा सुरु होण्यासाठी प्रत्येक जनावराचे लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी तातडीने पावले उचलून जनावरांच्या बाजारात येणाऱ्या प्रत्येक जनावराचे लसीकरण करून घ्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी व पशुसंवर्धन विभागाला नुकत्याच दिल्या आहेत.

“पशुंना तोंडाचे व पायाचे साथीचे रोग होतात.परिणामी,दुधाळ जनावरांच्यादूध देण्याच्या क्षमतेवर व गाडया ओढणाऱ्या बैलांच्या कार्यक्षमतेवर विपरित परिणाम होतो.त्यामुळे जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नियमितपणे लसीकरण करणे आवश्यक असल्यामुळे हाताच्या व पायाच्या रोगांची लस पुरविण्यासाठी आदिवासी लाभार्थींना शंभर टक्के अनुदानावर हया सुविधा दिल्या जातात त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे गरजेचे आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा मतदार संघ.

कोपरगाव येथील कृषी विभागाच्या तालुका समन्वय समितीची बैठक नुकतीच आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत तहसीलदार विजय बोरुडे यांच्या दालनात पार पडली त्यावेळी ते बोलत होते.सदर प्रसंगी याप्रसंगी कोपरगाव सभापती पोर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,सदस्य मधुकर टेके,श्रावण आसने,रोहिदास होन,जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते,कारभारी आगवण, राहुल रोहमारे,कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,प्रभारी तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशूर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

यावेळी शेतकऱ्यांनी जनावरांच्या बाजारात येत असलेल्या अडचणी मांडल्या.मागील महिन्यात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जनावरांचे बाजार सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे जनावरांचे बाजारात शेतकरी आपले जनावरे विक्रीसाठी आणत आहेत. मात्र जनावरांचे लसीकरण झाले नसल्यामुळे बाजारात जनावरांच्या खरेदी–विक्री करतांना अडचणी येत आहे.कोपरगाव शहरातील जनावरांचा बाजार अतिशय मोठा आहे. या बाजारात जनावरांच्या खरेदी विक्रीतून मोठी उलाढाल होत असते. मात्र जनावरांचे लसीकरण प्रमाण अत्यल्प असल्यामुळे हि उलाढाल मंदावली असून त्याचे आर्थिक परिणाम जाणवत असून शेतकऱ्यांना अडचणी वाढल्या आहेत. त्यासाठी जनावरांचे बाजारात जी जनावरे खरेदी-विक्रीसाठी येतील त्या जनावरांचे लसीकरण तातडीने करून घ्या जेणेकरून जनावरांचा बाजार सुरळीतपणे सुरु होईल अशा सूचना आ.काळे यांनी शेवटी दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close