जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात गवारेनगरात पथदिव्यांचा प्रश्न मार्गी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील नव्याने समावेश झालेल्या गवारे नगर या उपनगरात पायाभूत सुविधांची वानवा असून या उपनगरात विकासाला सुरूवात करण्यात आली असून प्रथमदर्शनी पथ दिव्यांचा प्रश्न त्या प्रभागाच्या नगरसेविका दीपा वैभव गिरमे यांनी मार्गी लावला असल्याची माहिती नुकतीच प्राप्त झाली आहे.त्याबद्दल नागरिकानी समाधान व्यक्त केले आहे.

कोपरगाव शहरानाजीक नवीन उपनगरे मोठा प्रमाणावर निर्माण होत आहे.त्यासाठी पायाभूत सुविधांची गरज निर्माण होते.त्यासाठी वर्तमान नगराध्यक्ष,नगरसेवक,मुख्याधिकारी यांच्यावरील जबाबदारी मोठ्या प्रमाणावर वाढते.त्यानी आगामी काळाची गरज ओळखून सुविधा निर्माण केल्या तर नागरिकांच्या अडचणी दुर होतात.व त्या भागात नवनगरांचा विकास होतो.अशीच दूरगामी दृष्टी कोपरगाव नगरपरिषदेच्या नगरसेविका दीपा गिरमे यांनी दाखवली आहे.त्यामुळे त्या कौतुकाला पात्र ठरत आहे.त्याचे नागरिकांनी कौतुक केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव नगरपरिषदेचा व्याप खूपच मोठा होत चालला आहे.शिर्डी नजीक आंतरराष्ट्रीय तीर्थ क्षेत्र असल्याने या ठिकाणी जागा कमी भावात उपलब्ध होत असल्याने नवीन येणाऱ्या नागरिकांना कोपरगाव शहराचे आकर्षण निर्माण न झाले तर नवल ! कोपरगाव शहरात पायाभूत मानल्या जाणाऱ्या शैक्षणिक सुविधा व वैद्यकीय सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत.या शिवाय रेल्वे स्थानक आता काकडीचे विमानतळ याशिवाय समृद्धी महामार्ग नव्याने निर्माण होत आहे.त्यामुळे आगामी काळात नागरी वस्ती मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहे.या पार्श्वभूमीवर नवीन उपनगरे मोठा प्रमाणावर निर्माण होत आहे.त्यासाठी पायाभूत सुविधांची गरज निर्माण होते.त्यासाठी वर्तमान नगराध्यक्ष,नगरसेवक,मुख्याधिकारी यांच्यावरील जबाबदारी मोठ्या प्रमाणावर वाढते.त्यानी आगामी काळाची गरज ओळखून सुविधा निर्माण केल्या तर नागरिकांच्या अडचणी दुर होतात.व त्या भागात नवनगरांचा विकास होतो.अशीच दूरगामी दृष्टी कोपरगाव नगरपरिषदेच्या नगरसेविका दीपा गिरमे यांनी दाखवली आहे.

त्यांनी या नवनगरात रस्ते,पाणी,वीज,गटारी निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले असून त्यात गवारे नगर येथील नागरिकांना विजेची मोठा प्रमाणावर गरज होती.वीज हा शहर विकासासाठी महत्वाची गरज मानली जाते.याखेरीज पथदिवे असले तर चोऱ्या-माऱ्या कमी होतात.नागरिकांना विजेचा वापर करून आधुनिक सुविधांचा लाभ घेता येतो.त्या दृष्टीने त्यांनी नगरपरिषद व महावितरण यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे.नगरसेविका दीपा गिरमे यांच्या प्रयत्नाला नुकतेच यश मिळाले आहे.त्या बद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close