गुन्हे विषयक
कोपरगाव शहरात अवैध दारुस ऊत,पोलिसांची कारवाई
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात अवैध दारु व्यवसायास ऊत आला असून त्या विरोधात नागरिकांच्या तक्रारी वाढल्यावर कोपरगाव शहर पोलिसांनी आपले कारवाईचे अस्त्र बाहेर काढले असून पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी काल दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत आरोपी मनोज राजू आव्हाड (वय-२१) रा.दत्तनगर कोपरगाव यांचेसह सचिन राजेंद्र साळवे (वय-३४) रा.पाण्याच्या टाकीजवळ लक्ष्मीनगर कोपरगाव.या दोघांविरुद्ध कारवाई केली आहे.त्यामुळे अवैध व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
कोपरगाव शहरात वर्तमानात अवैध व्यवसायाने डोके वर काढले आहे.त्यामुळे अनेक गुन्हे वाढले आहे.हे अवैध व्यावसायिक शहराची शांतता भंग करू शकतात अशी शक्यता वाढली आहे.हनुमान नगर १०५ येथील घटनेने ते दाखवून दिले आहे.असे असताना काल दि.२३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास कारवाई केली आहे.त्यामुळे अवैध व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरात वर्तमानात अवैध व्यवसायाने डोके वर काढले आहे.त्यामुळे अनेक गुन्हे वाढले आहे.हे अवैध व्यावसायिक शहराची शांतता भंग करू शकतात अशी शक्यता वाढली आहे.हनुमान नगर १०५ येथील घटनेने ते दाखवून दिले आहे.असे असताना काल दि.२३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास कारवाई केली आहे.त्यात त्यांनी हनुमान नगर १०५ येथील एका घराचे भिंतीच्या आडोशाला आरोपी मनोज राजू आव्हाड हा अवैध व्यवसाय करताना आढळून आला आहे.त्याच्याकडे १५ लिटर गावठी हातभट्टीची दारू चोरून विक्री करताना आढळून आला आहे.त्याची किंमत पोलीस दप्तरा नुसार ०१ हजार ५०० रुपये आहे.तो प्लास्टिकच्या छोट्या पिशवीत घालून ती विक्री करत होता.त्याला रंगेहात पकडण्यात आले आहे.
दरम्यान दुसऱ्या घटनेत कोपरगाव राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव बस आगाराच्या जवळ कांचन वाईन्स शेजारी दुसरा आरोपी सचिन साळवे हा आपल्या फायद्यासाठी चोरून हातभट्टीची दारू विक्री करताना आढळून आला आहे.त्याच्याकडे ०९ लिटर गावठी हातभट्टीची आंबट उग्र वास येत असलेली काळ्या रंगांच्या प्लास्टिकच्या पिशवीत घालून दारू चोरून विक्री करताना आढळून आला आहे.त्याची किंमत पोलीस दप्तरा नुसार ९०० रुपये आहे.तो प्लास्टिकच्या छोट्या पिशवीत घालून ती विक्री करत होता.त्याच्याकडे अशा ३६ पिशव्या आढळून आल्या आहेत.त्याला रंगेहात पकडण्यात आले आहे.दोन्ही घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी भेट दिली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पो.कॉ.संभाजी शिंदे व सचिन शेवाळे यांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहे.या प्रकरणी अधिकाऱ्यांचे नागरिकांनी कौतुक केले आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी दोन स्वतंत्र गुन्हे मुंबई पोलीस ऍक्ट कलम ६५ (ई) प्रमाणे दाखल केले आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी.एस.कोरेकर व पोलीस हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.