आरोग्य
कोपरगावात सर्व रोग निदान शिबिर संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आर्यन ग्रुप व संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच मोफत सर्वरोग निदान शिबिर उत्साहात संपन्न झाले आहे.त्याचे उदघाटन आ.काळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
आरोग्यसेवांसाठी निरनिराळी शिबीरे हा गेल्याअनेक दशकात आपल्याकडे रूढ झालेला प्रकार आहे.निवडणूका आल्याकी त्याला जनसंपर्क साधण्याचे साधन ठरवून जास्तीचा जोर येतो मात्र यात उपचार करणारे वैद्यक कुशल आहे का याची खातरजमा करणे गरजेचे आहे.नाही तर छत्तीसगढमधल्या विलासपूर येथे झालेले कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया शिबीर अनेक स्त्रिया मृत झाल्यामुळे देशभर त्याची चर्चा देशभर झाली होती.याची खबरदारी घ्यायला हवी.
कोपरगाव शहरातील आयर्न ग्रुप व संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक दहा येथे हे सर्वरोग निदान शिबिर आयोजीत करण्यात आले होते.त्याला नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.
त्यावेळी आ.काळे यांनी आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.त्यात ते म्हणाले की,”आर्यन ग्रुपने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासून सामाजिक उपक्रम राबविले आहे.कोपरगाव शहराच्या विविध भागात अनेक विकासाच्या समस्या आहेत त्याप्रमाणे प्रभाग क्रमांक १० मध्ये देखील विकासाच्या अनेक समस्या आहेत.या समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत तुमच्या प्रभागातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक निवडून द्या अशी हाकारी दिली आहे.व तुमच्या विकासाची जबाबदारी आपण घेतो व तुमच्या प्रभागाच्या विकासाच्या समस्या सोडविण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देईल असे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आश्वासन देण्यास ते विसरले नाही.