न्यायिक वृत्त
सांगवी भुसार येथे विधी साक्षरता शिबीर उत्साहात संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
समाजातील तंटे सामोपचाराने मिटले पाहिजेत.विनाकारण वेळ,पैसा खर्च होणार नाही,प्रशासनावर ताण पडणार नाही.याची आपण सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे.महिला व ग्रामीण भागाच्या सक्षमीकरणासंदर्भात,आर्थिक साक्षरतेसंदर्भात आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून या विषयाकडे गांभीर्याने विचार पुर्वक लक्ष दिले पाहिजे.गत जणगणनेतील आकडा पाहता भयानक परिस्थिती समोर येत असल्याचे प्रतिपादन कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायमूर्ती.एम.एस.बोधनकर यांनी नुकतेच सांगवी भुसार येथील कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुका विधी सेवा समिती,कोपरगाव वकील संघ व सांगवी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांगवी भुसार येथील हनुमान मंदिरात विधी साक्षरता शिबिराचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्या.एम.एस.बोधनकर हे होते त्या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.
सदर प्रसंगी जिल्हा न्या.न्या.सयाजीराव कोऱ्हाळे,कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष अड.शिरीशकुमार लोहकणे, माजी अध्यक्ष अड.शंतनू धोर्डे, अड.अशोकराव वहाडणे,सर्जेराव जाधव,विजयराव जाधव सरपंच,ग्रामस्थ,ग्रामविकास अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी उपस्थितांना न्या.सयाजीराव कोऱ्हाळे,जेष्ठ विधिज्ञ शंतनू धोर्डे,जिल्हा सरकारी वकील अशोकराव वाहाडणे आदींनी मार्गदर्शन केले आहे.
उपस्थितांचे स्वागत अड.शंतनू धोर्डे यांनी केले तर आभार अड.अशोकराव वहाडणे यांनी मानले.