कोपरगाव तालुका
कोपरगावातील स्वच्छता दूत घोडके यांना पुरस्कार प्रदान

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जाणता राजा प्रतिष्ठानचा “समाजरत्न पुरस्कार” आदर्श ग्राम पाटोदाचे सरपंच भास्करराव पेरे यांचे हस्ते स्वच्छतादूत सुशांत घोडके यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला आहे.त्यांच्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
“आजपर्यंत केलेल्या कार्याचा आदर्श भास्करराव पेरे यांच्या सारख्या प्रसिद्ध व्यक्तीमत्वाचे हातून समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान झाल्याने समाधान व सार्थक वाटत असल्याची प्रतिक्रिया” स्वच्छतादूत घोडके यांनी दिली आहे.घोडके यांनी स्वच्छता,जलशक्ती,वृक्षारोपण आणि पर्यावरण क्षेत्रात काम केले आहे.
नेवासा तालुक्यातील भानस हिवरा येथील जाणता राजा प्रतिष्ठान वतीने मातोश्री स्व.सौ.द्वारकाबाई मारुतराव मोहिटे पाटील स्मरणार्थ कोपरगाव येथील स्वच्छतादूत सुशांत घोडके यांना स्वच्छता व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल “समाजरत्न” पुरस्कार वितरण प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अंबादास कोरडे,श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे,जाणता राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव मोहिटे पाटील, यांचे सह विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त मान्यवर,भानसहिवरा व नेवासा ग्रामस्थ उपस्थित होते.
आजपर्यंत केलेल्या कार्याचा आदर्श भास्करराव पेरे यांच्या सारख्या प्रसिद्ध व्यक्तीमत्वाचे हातून समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान झाल्याने समाधान व सार्थक वाटत असल्याची प्रतिक्रिया स्वच्छतादूत घोडके यांनी दिली आहे.स्वच्छता,जलशक्ती,वृक्षारोपण आणि पर्यावरण क्षेत्रात त्यांनी काम केले आहे.