दळणवळण
कोपरगाव तालुक्यातील.’त्या’रस्त्याचे काम अखेर सुरु
न्यूजसेवा
संवत्सर-(शिवाजी गायकवाड)
राज्याचा महात्वाकांक्षी प्रकल्प असलेला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे कामामुळे संलग्न रस्त्यांची वाट लागली होती.त्या निषेधार्थ नुकतेच संवत्सर येथे ‘शृंगेश्वर’ चौफुलीवर आंदोलन केले होते त्याची दखल घेऊन या मार्गाचे नुकतेच काम सुरु केल्याने सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे व ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले आहे.
नागपूर ते शिर्डी हे काम जवळपास पूर्ण झाले आहे.मात्र कोपरगाव पासून घोटी पर्यंत या कामाला अद्याप न्याय दिला गेलेला नाही.त्यामुळे सरकारचे व या महामार्गालगतच्या गावांच्या संलग्न रस्त्यांचे व नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत घडली होती.त्या विरोधात ग्रामस्थांत असंतोष धुमसत होता.त्यामुळे ग्रामस्थांनी नुकताच जुन्या मुंबई-नागपूर मार्गावरील चौफुलीवर “रास्ता रोको”आंदोलन केले होते.लेखी दिल्यानंतर हे काम सुरु झाले आहे.
राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक-व्यावसायिक दाव्याला बळकटी देण्यासाठी या मोहिमेमध्ये,भाजप राजवटीत महाराष्ट्र राज्य सरकारने मुंबई-नागपूर या महामार्गाचे काम सुरु केले आहे.राज्यात आघाडी सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी या महामार्गाचे नाव ‘हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे केले आहे.या मार्गाची लांबी ७१० कि.मी.आहे.सरकारने नागपूर-मुंबई शीघ्र संचार ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे.त्याचे काम नागपूरच्या बाजूने आटोपले असले तरी नगर जिल्ह्यात मात्र त्याला मंद गतीने ग्रासले आहे.
नगर जिल्ह्यात गायत्री या कंपनीकडे हे काम देण्यात आले आहे.मात्र त्यांनी या कामाला योग्य न्याय दिलेला नाही.नागपूर ते शिर्डी हे काम जवळपास पूर्ण झाले आहे.मात्र कोपरगाव पासून घोटी पर्यंत या कामाला अद्याप न्याय दिला गेलेला नाही.त्यामुळे सरकारचे व या महामार्गालगतच्या गावांच्या संलग्न रस्त्यांचे व नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत घडली होती.त्या विरोधात ग्रामस्थांत असंतोष धुमसत होता.त्यामुळे ग्रामस्थांनी नुकताच जुन्या मुंबई-नागपूर मार्गावरील चौफुलीवर “रास्ता रोको”आंदोलन केले होते.त्याची दखल घेऊन या आंदोलन कर्त्यांना गायत्री कंपनी व गोदावरी बायोकेमिकल कंपनी यांच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लेखी दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते.
या नादुरुस्त मार्गाचे काम सुरु झाल्याबद्दल गोदावरी परजणे तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,संवत्सर ग्रामपंचायतीचे सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,बाजार समितीचे संचालक भरत बोरणारे,चंदकांत लोखंडे,लक्ष्मण साबळे,बाबुराव मैन्द,काका गायकवाड,सतीश शेटे,राजेश भामरे,ज्ञानदेव कासार,दिनकर वरगुडे,निवृत्ती लोखंडे आदी प्रमुख मान्यवरांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.