दळणवळण
नगर-मनमाड राज्य मार्गावर पालखी मार्ग विकसित करा-मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमान स्थितीत अत्यंत दयनीय स्थितीत असलेला नगर-मनमाड हा राज्य मार्ग हा दुरुस्त करणे निकडीचे बनले असून त्याच्या दुरुस्तीवर राज्य सरकारने खर्च करण्याऐवजी हा राज्य मार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करुन या मार्गावर साईबाबांचे शिर्डी हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्याने पालखी मार्ग विकसित करावा अशी महत्वपूर्ण मागणी कोपरगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष नितीन शिंदे यांनी नुकतीच केंद्र सरकारकडे केली आहे.
“सिन्नर-शिर्डी हा राष्ट्रीय मार्ग खूपच गर्दीचा असल्याने त्यावरील हलकी व प्रवासी वाहतूक कमी करण्यासाठी त्यांनी जवळके मार्गे वावी-शिर्डी हा जवळचा मार्ग पालखी मार्ग विकसित करावा.या पालखी मार्गामुळे मुंबई,ठाणे,कल्याण,कोकण,गुजरात आदी ठिकाणाहून येणाऱ्या साई पालख्या या या मार्गावरून येतील परिणामस्वरूप शिर्डी-सिन्नर मार्गावरील हलक्या वाहनांचा व पालख्यांचा भार कमी होऊन अपघात कमी होण्यास मदत होणार आहे.त्यामुळे शिर्डीतील नगर-मनमाड,व शिर्डी-सिन्नर या मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होऊन जीवित व वित्तीय हानी कमी होण्यास मदत मिळणार आहे”-नितीन शिंदे,तालुकाध्यक्ष कोपरगाव तालुका काँग्रेस.
उत्तर भारतीयांना दक्षिण भारतात जाण्यासाठी सर्वात जवळचा ठरणारा व दक्षिण नगर जिल्ह्याला उत्तर नगर जिल्ह्याशी जोडणारा राज्य मार्ग म्हणून नगर-मनमाड या मार्गाची खरी ओळख असली तरी वर्तमानात हा मार्ग म्हणजे अवजड वाहतुकदारांना मृत्यूचा सापळा ठरला आहे.सन-२००० साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या रस्त्याचे उदघाटन करून या मार्गाच्या कामाचा शुभारंभ केला होंता.त्या नंतर जवळपास एक तप या मार्गाच्या कामास सुरुवात झाली नव्हती.या मार्गावर मोठी अवजड वहातून सुरु असून त्याचा अतिरिक्त भार या महामार्गावर पडत असतो.या उत्तर नगर जिल्ह्यात मोठया प्रमाणावर साखर सम्राट नेते असताना या महामार्गाईतकी हेळसांड कोणत्याही मार्गाची झाली नाही.त्यामुळे या राज्य मार्गावर प्रतिमाह डझनावारी मृत्यू होत असतात.तरी त्याची दखल कोणालाही घ्यावी वाटत नाही.मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले नेते केवळ आपल्या मतदारसंघातच कुपमंडूप प्रवृत्तीने राहण्यात समाधान मानत आले आहे.त्यांची कृतिशून्य वर्तणूक नागरिकांच्या जीवनावर वारंवार बेतली आहे.या बाबत प्रत्येक निवडणुकीत आश्वासनाचा खेळ रंगात आला आहे.मात्र निवडणूक संपली मतपेट्या बंदिस्त झाल्या की हि मंडळी त्या गावाची राहात नाही.असा वारंवार अनुभव आला आहे.कोपरगाव,राहाता,श्रीरामपूर,राहुरी येथील नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच या मार्गाने प्रवास करावा लागतो.यावर पर्याय म्हणून २०१३-१४ साली तत्कालीन खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी मार्गे नगर-सिन्नर हा नूतन मार्ग केंद्र सरकारकडून मंजूर केला होता.त्याचे काम प्रगती पथावर असून पुढे हा मार्ग सावळीविहिर या ठिकाणाहून इंदोरपर्यंत वाढवावा व या मार्गावर साईबाबांचे शिर्डी हे तीर्थक्षेत्र असल्याने यावर पालखी मार्ग विकसित करावा अशी मागणी पुढे आली आहे.हा मार्ग मुंबई-आग्रा यास जोडण्याची मागणी पुढे आली आहे.ती रास्त असून त्याला नितीन शिंदे यांनी दुजोरा दिला असून त्याच मार्गात जुना नगर-मनमाड राज्य मार्ग रूपांतरित करावा अशी रास्त मागणी त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.सदाशिव लोखंडे यांचेकडे व केंद्राकडे केली आहे.