जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यात कोरोनाने एकाचे निधन

जाहिरात-9423439946
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात कोरोना रुग्णवाढीसाठी संगमनेर पाठोपाठ स्पर्धा सुरू झाली असून काल अलीकडील काळातील सर्वाधिक ४१ रुग्ण आढळून आले होते. आज आलेल्या अहवालात पोहेगाव गटातील बहादरपूर,जवळके,मढी येथे प्रत्येकी ०१ रुग्ण आढळले आहे.तर तालुक्यात टाकळी येथे सर्वाधिक ०३ रुग्ण तर कोळपेवाडी येथे ०१ रुग्ण आढळले आहे.असे तालुक्यात ०७ रुग्ण आढळून आले असून मढी येथील एका ८२ वर्षीय इसमाचे निधन झाले आहे.तर शहरात ०७ रुग्ण आढळले आहे.दरम्यान रुग्णसंख्या रोडावली आहे हि समाधानाची बाब आहे. राज्यात कोरोनाचा कहर आता अलीकडील काळात अधिक वेग घेताना दिसत येत सरकारने आता पुन्हा एकदा दुकांनाचाही वेळ वाढवून ती रात्री दहा वाजेपर्यंत केली असून कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ८०२ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात ०९ रुग्ण बाधित आढळले असून ७९३ निरंक आढळले आहे.तर नगर येथे ६५१ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०० तर अँटीजन तपासणीत ०९ खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०५ असे एकूण अहवालात मोठी वाढ येऊन केवळ १४ रुग्ण बाधित आढळले आहे.तर २८ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे.
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १४ हजार ५६४ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १०९ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत २२० जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५१ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ०२ लाख ०१ हजार ०११ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०८ लाख ०४ हजार ०४४ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा ०७.२५ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर १४ हजार २३५ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९७.७४ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०३ लाख ३३ हजार ६११ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०४ हजार १८६ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०३ लाख २२ हजार ५२२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०६ हजार ९०२ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.दरम्यान आता नागरिक मुक्तपणे फिरण्याचा आनंद घेताना दिसत असून बरेच जण कोरोनाची साथ गायब झाल्याच्या अविर्भावात वावरताना दिसत आहे.यात्रा,लग्न,दहावे,वर्षश्राद्ध,तेरावे,सुपारी आदी कार्यक्रम जोरात सुरु असल्याने कोरोनाचा विषाणू पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत तालुक्यासह राज्यात आणि देशात कोरोना पुन्हा उचल खाण्याच्या तयारीत आहे.त्यातून त्या बाबत केंद्र सरकारने राज्यांना दक्षतेचा इशारा दिला आहे.दुकाने पुन्हा रात्री दहा पर्यंत सुरु ठेवण्यास व आठवडे बाजार प्रारंभ केला आहे. रुग्णवाढीमुळे राहाता तालुक्यात आता नागरिकांना आपली आस्थापने केवळ सकाळी ०८ ते दुपारी ०४ पर्यंत उघडण्यास परवानगी दिली असून वेळ घटवली आहे.व जिल्ह्यात जवळपास एकसष्ठ गावे प्रतिबंधित केले आहे.त्यात कोपरगाव तालुक्याचा समावेश असून या तालुक्याचा आलेख अलीकडील काळात चिंताजनक वाढला आहे.त्यामुळे ग्रामीण भागासह आता शहरी भागातही रुग्णसंख्या रोडावल्याने नागरिकांत पुन्हा समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close