कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात कुस्ती प्रशिक्षणासाठी खेळाडूंची भरती
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक व क्रिडा संकुलाचे आत्मा मालिक कुस्ती केंद्र, येथे दिनांक ११ ते १२ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत भारतीय खेळ प्राधीकरण (साई) यांच्या मार्फत १२ ते १६ वयोगटाखालील मुलांची कुस्ती या खेळासाठी खेळाडुंची निवड प्रक्रीया भरती केली जाणार आहे.तरी इच्छुक खेळांडुनी या भरती प्रक्रीयेत सहभागी व्हावे असे आवाहन विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट तथा आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठाण चे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी साहेब व आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक एन.आय.एस. कुस्ती प्रशिक्षक भरत नायकल यांचे वतीने करण्यात आले आहे.
या भरती व निवड प्रक्रीयेतील पाञता व निकष पुढील प्रमाणे आहेत. खेळाडूचे वय १२ ते १६ वर्षे झालेल्या खेळाडुंना अधिक प्राधान्य दिले जाईल.या भरती व निवड प्रक्रीयेसाठी खेळाडूने सोबत आधार कार्ड, बोनाफाईड, जन्मदाखला, खेळाचे प्रमाणपञ, मुळप्रत व झेरॉक्स तसेच पासपोर्ट साईज ०४ फोटो रंगीत सोबत आणावे.हि निवड प्रक्रीया आत्मा मालिक कुस्ती केंद्र कोकमठाण येथे होणार आहे.सर्व खेळाडूंनी सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत नावनोंदणी करावयाची आहे. उशीरा झालेल्या खेळाडूंचा विचार केला जाणार नाही.
नाव नोंदणीसाठी विवेक नायकल ९५१८६५३४९५,अक्षय डांगे ८७६६७२९९९५ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन शेवटी केले आहे.