कोपरगाव तालुका
कोपरगाव,राहाता तालुक्याला पावसाने झोडपले,काढणीचे खरीप धोक्यात
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
गुलाब चक्रीवादळ हे काल संध्याकाळी उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण उडीशामधील कलिंगपट्टणम ते गोपाळपूरमध्ये धडकल्यानंतर चक्रीवादळाचा वेग कमी झाला आहे आणि हे चक्रीवादळ आता कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतरीत झाले असून हे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राकडे पुढे सरकले असून पुढील दोन ते तीन दिवस धुवांधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती ती खरी ठरली असून कोपरगाव तालुक्यात रात्री पासून पावसाने थैमान मांडले आहे.मात्र तालुक्यात सायंकाळी उशिरापर्यंत कुठेही जीवित अथवा वित्तीय हानी झाली नसल्याचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी दिली आहे.मात्र ब्राम्हणगाव या ठिकाणी गावात २५ घरात पाणी घुसले ते काढण्यासाठी जेसीबी यंत्रांच्या सहाय्याने प्रयत्न सुरु असून तेथील नागरिकांना अन्यत्र हलविण्यात आले आहे.
कोपरगाव तालुक्यात आज सकाळी ०८.३० पासून ते सायंकाळी ०५.३० पर्यंत ४० मी.मी.पावसाची नोंद जेऊर कुंभारी येथे नोंद झाली आहे.अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही त्यामुळे खरीप पिकांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान उशिराने मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव साठवण बंधारा भरल्याने ब्राह्मणगाव ग्रामपंचायत हद्दीतील अंदाजे २५ घरांमध्ये पाणी शिरलेले असल्याचे वृत्त हाती आले आहे.ते पाणी काढून देण्यासाठी जेसीबी यंत्राने अडथळा आणणाऱ्या काटेरी झुडपे काढण्याचे काम वेगाने चालू केले आहे.ब्राह्मणगाव हद्दीतील २५ घरे,कोपरगावच्या खडकी या उपनगरातील ४० घरे येसगाव,नाटेगाव ८ घरांमध्ये पाणी शिरलेले आहे.सदर कुटुंबाची व्यवस्था आजूबाजूच्या ठिकाणी करण्यात आली आहे.त्यांची भोजणाची व्यवस्था करण्यात आली आहे.मात्र यात कुठेही जीवित वा वित्तीय हानी नाही झालेली नसल्याची माहिती तहसीलदार विजय बोरुडे यांनी नुकतीच दिली आहे.
आज विदर्भ,मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला होता.ज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी बघायला मिळणार असल्याचे अनुमान व्यक्त करण्यात आले होते ते बरोबर ठरले असून कोपरगाव तालुक्याला पावसाने आज सकाळपासून जोरदार तडाखा दिला आहे.
दरम्यान आज उशिरा जलसंपदा विभागाने गोदावरी नदी पात्रातील २ हजार क्युसेकने सोडण्यात आलेले पाणी पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने ते ०३ हजार क्युसेकने वाढविण्यात आल्याचे वृत्त आहे.
कोपरगाव तालुक्यात आज सकाळी ०८.३० पासून ते सायंकाळी ०५.३० पर्यंत ४० मी.मी.पावसाची नोंद जेऊर कुंभारी येथे नोंद झाली आहे.अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही त्यामुळे खरीप पिकांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
सोबतच वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.मात्र हा पासून संथ बरसत आहे.या पावसामुळे कापणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.प्रामुख्याने कोपरगाव,संगमनेर,राहाता आणि श्रीरामपूर आदी तालुक्यात सोयाबीन आणि बाजरी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसू शकतो.त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.