जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात इसमाचा मृतदेह,अकस्मात मृत्यूची नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत स्मशान भूमीच्या पूर्वेस गोदावरी नदी काठी पुरात एक ४०-४५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने संवत्सरसह परिसरात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात एका गुरे चारणाऱ्या इसमाने संवत्सर हद्दीत गोदावरी नदी पात्रात कडेला स्मशान भूमी नजीक एक कुजलेला मृतदेह आढळून आला असल्याचे सांगितले. त्यामुळे या घटनेची खबर मिळल्याबरोबर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली.व स्थळ पंचनामा केला आहे.

नाशिक जिल्ह्यातील दारणा,गंगापूर,कश्यपी आदी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असल्याने धरणाचे खपाटीतील गेलेले पोट भरून जलसंपदा विभागाने गोदावरी नदीला पाणी सोडले आहे.त्यामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आलेला आहे.त्यातच अनेक ठिकाणी दुर्घटना झालेल्या असून या पूर पाण्यात हे मृतदेह वाहून येण्याची हि काही पहिलीच वेळ नाही.अनेक वेळा पावसाळ्यात असे मृतदेह वाहून येत असतात अशीच घटना नुकतीच संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.

आज सकाळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात एका गुरे चारणाऱ्या इसमाने संवत्सर हद्दीत गोदावरी नदी पात्रात कडेला स्मशान भूमी नजीक एक कुजलेला मृतदेह आढळून आला असल्याचे सांगितले. त्यामुळे या घटनेची खबर मिळल्याबरोबर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आपल्या काही सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी त्यांना जाण्यासाठी नीट रस्ता नव्हता याठिकाणी मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडपे आहे.त्यामुळे त्यांना जाण्यासाठी अखेर त्यांनी एक जेसीबी यंत्राची मदत घ्यावी लागली.व त्याच्या सहाय्याने त्या जागेवर प्रवेश मिळवला व घटनास्थळी भेट दिली.

त्या ठिकाणी एक साधारण चाळीस-पंचेचाळीस वर्षाच्या इसमाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला आहे.त्या मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणणे शक्य नसल्याने त्या ठिकाणीच वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करून घटनास्थळीच शवविच्छेदन केले.व मृतदेहाची विल्हेवाट लावली आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी आपल्या नोंदवहीत अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ.हे.करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close