कोपरगाव तालुका
कोपरगावात जागतिक ओझोन दिन साजरा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार १९९५ सालापासून हा दिवस पाळला जातो.१९७८ साली कॅनडातल्या मॉन्ट्रिअल शहरातील परिषदेमध्ये रसायनांमुळे ओझोनच्या थरावर होणा-या दुष्परिणामांबाबत उपाय करण्यासाठी अनेक देशांनी सहमती दर्शवली.हा करार पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
कारण रसायनांतील बदलांसाठी २०१० आणि २०३० या कालमर्यादा ठरल्या व त्या पाळल्या जात आहेत.जागतिक ओझोन दिनानिमित्त कोपरगाव येथील के.जे.सोमय्या महाविद्यालयाच्या भूगोल विभागाने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
“पृथ्वीवरील ओझोन आवरण वाचवण्यासाठी तरुण विद्यार्थ्यानीं पुढे आले पाहिजे, स्थानिक पातळीवरील संसाधनांचा विवेकी वापर करून अतीआरामदायी जीवन पद्धतीचा त्याग करून आपल्या गरजांवर मर्यादा घातल्या पाहिजे त्याच बरोबर ओझोनचा ऱ्हास थांबवण्यासाठी तरुणाईने निसर्गपूरक जीवनशैली स्वीकारावी ” असे आवाहन त्यांनी प्रा .चेतराज शर्मा यांनी केले. प्रा, शर्मा हे नरबहादूर भंडारी शासकीय महाविद्यालय, गंगटोक सिक्कीम येथे कार्यरत आहेत.ते पुढे असे म्हणाले कि ” माता वसुंधरेच्या संरक्षणाची जबाबदारी तरुण विद्यार्थ्यांच्या खांद्यावर आहे व ती जबाबदारी ते सक्षमपणे पेलवतील मात्र यासाठी “थिंक ग्लोबली बट ऍक्ट लोकली” असे धोरण स्वीकारले पाहिजे.