मनोरंजन
कोपरगाव नाट्यगृहातील अस्वच्छता दूर करा-नाट्यप्रेमींची मागणी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
संगीत नाटक हा महाराष्ट्राच्या मातीतला एक अभिजात कलाप्रकार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संगीताच्या स्वरांनी कुठल्याना कुठल्या रूपात मराठी मनांवर अधिराज्य गाजवलं आहे. वारकरी संप्रदायामुळे भजन, कीर्तन, ओव्या, भारुड यातून बहुजन समाज समृद्ध झाला. लोकसंगीत, तमाशा, पोवाडा, गवळण, लावणी याही प्रकारांनी रसिक घडत गेले.कोपरगावला नाट्यचळवळीचा मोठा इतिहास आहे मात्र तो आता लोप पावतो कि काय इथपर्यंत सत्त्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष या चळवळीकडे झाले आहे.कोपरगावचे खुले नाट्यगृह हा त्याचा जिता जागता पुरावा मानावा लागेल.
शैलेश शिंदे यांनी या बाबत कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांना नुकतेच निवेदन दिले असून गेल्या बारा ते तेरा वर्षापासून कोपरगाव शहरात नाट्यचळवळीचे कार्यकर्ते जागृती करण्याचे काम करत आहे.गेल्या कित्येक वर्षापासून नाट्य कलाप्रेमी या नाट्यगगृहात तालीम करीत आहे. पण गेल्या दोन-तीन वर्षात याठिकाणी कचरा गाड्याचे वाहनतळ आणि भंगार वस्तूचे अडगळीचे ठिकाण बनले आहे. या ठिकाणी मोकाट जनावरांचा कोंडवाडा बनवला गेला आहे. या ठिकाणी सर्व गाड्या, भंगार वस्तू हलवून स्वच्छता केल्यास नाट्यग्रह परत चांगले दिवस येऊ शकतात. प्रशासनानेही नाट्यगृहात फक्त सांस्कृतिक कार्यक्रम व्हावे कलाकार घडावे या हेतूने नाट्यग्रह नाट्यग्रह बांधलेले असते.पण कोपरगाव चे नाट्यगृह पालिका डम्पिंग ग्राऊंड म्हणून वापर करत आहे, म्हणून कोपरगाव शहरात सांस्कृतिक चळवळ लोप पावत आहे. आपण आमच्या अर्जाचा विचार करावा व येत्या दोन ते तीन दिवसात कचरा गाड्यांचे वाहन तळ हलवून स्वच्छता करावी अशी मागणीही त्यांनी शेवटी केली आहे.