कोपरगाव तालुका
भाजप नेत्यांच्या ‘त्या’ भ्रष्टाचाराची चौकशी करा-या नेत्यांची मागणी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी नेवासे पंचायत समितीतील एका कर्मचाऱ्याने बचतगट प्रकरणात तब्बल एक हजार रुपये (एक हजार कोटी नव्हे) लाच मागितल्याचे मोठे (?) प्रकरण उघडकीस आणल्याचा पराक्रम केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.आता भ्रष्टाचाराविरुद्ध वाकचौरे यांनी लढाई सुरू केलीच आहे म्हणून त्यांना आपण जाहिर आवाहन करतो कि,”तुम्ही भाजपाचे जेष्ठ नेते आहात.तुम्ही आता भाजपामधील काही नेत्यांनी प्रचंड माया कुठून जमा केली,आलिशान गाड्या-हवेल्या कशा उभ्या केल्या याबद्दलही चौकशी करून भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणावी असेल आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतेच एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
भाजप नेते जालिंदर वाकचौरे यांनी नुकतेच नेवासे पंचायत समितीतील एका पंचायत समितीत बचत गटाचे प्रकरणात एक हजार रुपयांचे लाच मागीतल्याचे प्रकरण उघडकीस आणले आहे.त्याबद्दल जिल्ह्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.यावर कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी उडी घेऊन आपले मत एका प्रसिद्धी पत्रकान्वये व्यक्त केले आहे.
त्यात त्यानी हे आवाहन केले आहे.त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”भाजप हा पक्ष पं.दिनदयाळ उपाध्याय व रा.स्व.संघाच्या विचारांवर कार्यरत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे निष्कलंक नेते देशाचे नेतृत्व करत असून त्यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत असतांना श्री.वाकचौरे यांनी आता भ्रष्टाचाराविरुद्ध उभे रहावे. हे नक्कीच कौतुकास्पद आहे.त्यांच्या मागे जिल्हा भाजप नक्कीच उभा राहिल.असा आशावाद व्यक्त करून त्यांनी ते जेष्ठ नेते असल्याने ते ही लढाई करतील असे वाटत असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.पक्षांतर्गत बैठकीमध्ये तुमच्या मांडीला मांडी लावून बसणारे अनेकजण आपल्याला सहकार्य करतील अशी आपल्याला आशा वाटत असल्याचेही नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी म्हटलें आहे.