गुन्हे विषयक
कोपरगावात बायकोने नवऱ्याला बदडले,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील जोशी नगर येथील रहिवासी असलेल्या नवरा बायकोत नगर परिषदेच्या कचरा गाडीत कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात बायकोने नवऱ्याला वाईट-साईट शिवीगाळ करत लाथा बुक्यांनी व चिनी मातीचा मग डोक्यात मारून नवऱ्याला जखमी केल्याचा चमत्कारिक गुन्हा नवरोबा ऋषिकेश सुनील खैरनार (वय-३२) याने आपली बायको अमृता खैरनार हिच्या विरुद्ध दाखल केल्याने शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.या हाणामारीत नवरोबा जखमी झाले असून ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
दि.२१ ऑगष्ट रोजी सकाळी ०९ वाजेच्या सुमारास नगरपरिषदेची कचरा टाकणारी गाडी,”गाडीवाला आया तो,कचरा निकाल” ची ललकारी करत आलेली असताना ‘तो’ कोणी टाकावा या वरून या दोघा नवरा बायकोत बेबनाव झाला व त्या किरकोळ कारणावरून त्याचे रूपांतर थेट हाणामारी पर्यंत गेले.आधी शिवीगाळ व नंतर थेट एकमेकांना लाथा बुक्यांनी आणि नंतर चिनी मातीचा मग डोक्यात घालण्यापर्यंत बायकोची मजल गेली आता बोला !
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी ऋषिकेश सुनील खैरनार व आरोपी महिला अमृता खैरनार यांचा काही वर्षांपूर्वी प्रेम विवाह झालेला असल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान सुरुवातीच्या काळात नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर या दोघात बेबनाव सुरु झाला.व दि.२१ ऑगष्ट रोजी सकाळी ०९ वाजेच्या सुमारास नगरपरिषदेची कचरा टाकणारी गाडी,”गाडीवाला आया तो,कचरा निकाल” चा घोष करत आलेली असताना ‘तो’ कोणी टाकावा या वरून या दोघा नवरा बायकोत बेबनाव झाला व त्या किरकोळ कारणावरून त्याचे रूपांतर थेट हाणामारी पर्यंत गेले.आधी शिवीगाळ व नंतर थेट एकमेकांना लाथा बुक्यांनी मारहाण इतपर्यंत बायकोची मजल गेली.(आता लोकशाहीत खऱ्या अर्थाने महिला समर्थ झाल्या असे म्हणायला हरकत नाही) त्याच दरम्यान आरोपी बायकोच्या हातात रागाच्या भरात चिनी मातीचा मग आला आणि तिने कुठलाही मागचा पुढचा विचार न करताच तोच तिने नवरोबाच्या डोक्यात घातला.परिणामस्वरूप नवरोबा या वाराने चांगलेच घायाळ झाले.पण हा ‘नाजूक’ (मामला) गुन्हा दाखल करायचा की नाही याचा सखोल विचार केला.केला तर घराची अब्रू चव्हाट्यावर येण्याची भीती होती.न करावा तर शीघ्र कोपी बायकोवर नियंत्रण मिळवणे खूपच अवघड वाटत होते.त्यांनी बराच विचार करून अखेर आठवडा भराने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.व तो दि.२८ ऑगष्ट रोजी मोठे (!) धाडस करून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपी पत्नी विरुद्ध गु.क्रं.२६७/२०२१ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत आहेत.दरम्यान या घटनेची शहरात सर्वत्र खमंग चर्चा नागरिकांना ऐकायला मिळत आहे.