कोपरगाव तालुका
करंजीतून शेतकरी गायब,मुलाची पोलिसात तक्रार
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी शेतकरी दिगंबर आनंदा भिंगारे (वय-39) हे रविवार दि.24 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास गावात जाऊन येतो असे सांगून गेले ते अद्यापपावेतो पुन्हा घराकडे परतलेच नसल्याची तक्रार त्यांचा मुलगा अतुल दिगंबर भिंगारे(वय-19)या मुलाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आज सकाळी दाखल केल्याने करंजी परिसरात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार अतुल भिंगारे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे कि, आपण व आपले कुटुंब करंजी गावातील रहिवाशी असून तेथे आपले कुटुंब शेती करून गुजराण करते.आपण शिक्षण घेत असून आपले वडील घरी परतले नसल्याने आपण सर्वत्र शोध घेतला.नातेवाईकांकडे पहिले मात्र ते मिळून आले नाही.
त्यांची शरीरयष्टी माध्यम असून रंगाने सावळे आहेत.उंची साडेपाच फूट असून त्यांच्या अंगात पांढऱ्या रंगाचा सदरा, काळ्या रंगाची विजार,पायात चप्पल,असल्याचेही त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.या रंगाचा,वर्णनाचा कोणी इसम आढळून आल्यास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनील कटके यांनी केले आहे.