गुन्हे विषयक
अंगणातील पाण्याच्या कारणावरून मारहाण,कोपरगावात सहा जणांवर गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील १०५ हनुमान नगर या उपनगरातील रहिवासी असलेली मुलगी आपल्या अंगणातील पाणी झाडून लोटत असताना त्याला त्याच भागातील आरोपी अमजद जाफर मन्यार,आवेज अमजद मनियार,रुबीना समजत मणियार,उजमा मनियार,जेबिन जरा मनियार,सोनू जलार मणियार आदींनी हरकत घेऊन आपल्या मुलीस लोखंडी गजाने मारहाण केल्याची फिर्याद मुलीच्या ३५ वर्षीय आईने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.या घटनेत महिलेची मुलगी गंभीर जखमी झाली होती..
या गुंह्यातील आरोपी अमजद मनियार,रुबीना समजत मणियार,उजमा मनियार,जेबिन जरा मनियार,सोनू जलार मणियार यांनी फिर्यादीची मुलगी हिला लाथा बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून दमदाटी केली.व आरोपी अहमद मण्यार याने फिर्यादी महिलेची साडी फेडून हाथ धरून या महिलेच्या इज्जतीला हात घातल्याचा व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला मीना शिरसाठ व आरोपी अमजद मण्यार यांचे घर शेजारी-शेजारीच आहे.दि.२६ ऑगष्ट रोजी दुपारी ०४ वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला व महिलेची मुलगी हि त्यांचे अंगण झाडत असताना त्यांच्या हातातील झाडूच्या सहाय्याने पाणी लोटीत असताना त्याचा आरोपीस राग येऊन त्यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून आरोपी अहमद मण्यार याने त्याच्या हातातील लोखंडी गजाच्या सहाय्याने फिर्यादी माहिलेच्या उजव्या हातावर व पायावर मारून जखमी केले व आरोपी अमजद मनियार,रुबीना समजत मणियार,उजमा मनियार,जेबिन जरा मनियार,सोनू जलार मणियार यांनी फिर्यादीची मुलगी हिला लाथा बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून दमदाटी केली.व आरोपी अहमद मण्यार याने फिर्यादी महिलेची साडी फेडून हाथ धरून या महिलेच्या इज्जतीला हात घातल्याचा व लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप केला आहे.या बाबत फिर्यादी महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान या घटनेत फिर्यादी महिलेची मुलगी मोनिका शिरसाठ हि जखमी झाली आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२६३/२०२१भा.द.वि.कलम १४३,१४७,१४८,१४९,३५४,३२४,३२३,५०४,५०६ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.जी पवार हे करीत आहेत.