कोपरगाव तालुका
भारतीय राज्यघटनेचे पावित्र्य जपण्याची गरज-पाटील
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
देशाची राज्यघटना हि आधुनिक जगातील आश्चर्य असून त्यामुळे जगाला भारतीय शक्तीचा अंदाज आला असून या राज्य घटनेच्या पावित्र्याला सर्वांनी जपले पाहिजे असे आवाहन कोपरगाव नजीक असलेल्या महर्षी विद्यालयाचे शिक्षक स्वप्नील पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
ऑगस्ट २९ १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस “भारतीय संविधान दिन” म्हणून साजरा केला जातो.नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. म्हणून हा दिवस साजरा करण्याची प्रथा भारतात सुरु झाली.
कोपरगांव येथिल संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी स्कुल मध्ये आज सकाळी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य पानसरे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले. प्रसंगी पर्यवेक्षिका जे.के. दरेकर, विद्यालयाचे शिक्षक मेघराज काकडे व स्वप्निल पाटील यांनी संविधानाबद्दलची माहीती सांगीतली. नागरीकांना असलेले मुलभुत अधिकार व मुलभूत कर्तव्याची माहीती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
प्रसंगी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे शिक्षक संजय दिवटे यांनी विद्यार्थ्यांना संविधान शपथ दिली. तसेच 26/11 च्या मुबंई हल्यात शहीद झालेल्या विरांना विद्यालयाच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे शिक्षक संजय कुलकर्णी, शिवप्रसाद घोडके, विनायक सांगळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक अनिल भागवत यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर कडलग यांनी मानले.