गुन्हे विषयक
कोपरगाव नजीक दुचाकीस अपघात दोन ठार,गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराच्या दक्षिणेस सुमारे तीन कि. मी.अंतरावर असलेल्या पुणतांबा चौफुलीवर रात्री ११.२५ वाजेच्या सुमारास महिंद्रा पिकअप क्रं.एम.एच.०४,जी.आर.१४२७) ने हिरो कंपनीच्या एच.एफ.डिलक्स (क्रं.एम.एच.१७ सि.डी.५५०२) ला जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुण संजय सावित्रा गांजवे (वय-४५) रा.स्वामी समर्थनगर संगमनेर व सतीष बाबासाहेब वाघ (वय-२५) रा.निघोज ता.राहाता हे दोघे ठार झाले आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.वाहन चालक घटनास्थळारून फरार झाला आहे.
संगमनेर येथील मयत तरुण हे आपल्या वरील क्रमांकाच्या एच.एफ.डिलक्स या दुचाकीवरून शिर्डी कडून संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलकडे रात्रीच्या ११.२५ वाजेच्या सुमारास संत जनार्दन स्वामी रुग्णालयात एका रुग्णास भेटण्यास जात असताना त्यांना कोपरगाव कडून शिर्डी कडे भरधाव वेगाने जात असलेल्या वरीक क्रमांकाच्या महिंद्रा पिकअपने समोरून येणाऱ्या हिरो एच.एफ.दिलक्सला दुचाकीस जोराची धडक दिली आहे.त्या दुर्घटनेत यातील एक तरुण संजय गांजवे हा जागीच ठार झाला तर दुसरा तरुण सतीष वाघ हा गंभीर रित्या जखमी झाला.उपचार सुरु सताना त्याचेही निधन झाले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,संगमनेर येथील मयत तरुण हे आपल्या वरील क्रमांकाच्या एच.एफ.डिलक्स या दुचाकीवरून शिर्डी कडून संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलकडे रात्रीच्या ११.२५ वाजेच्या सुमारास संत जनार्दन स्वामी रुग्णालयात एका रुग्णास भेटण्यास जात असताना त्यांना कोपरगाव कडून शिर्डी कडे भरधाव वेगाने जात असलेल्या वरीक क्रमांकाच्या महिंद्रा पिकअपने समोरून येणाऱ्या हिरो एच.एफ.दिलक्सला दुचाकीस जोराची धडक दिली आहे.त्या दुर्घटनेत यातील एक तरुण संजय गांजवे हा जागीच ठार झाला तर दुसरा तरुण सतीष वाघ हा गंभीर रित्या जखमी झाला.घटनास्थळी नजीकच्या नागरिकांनी धाव घेऊन त्या जखमी तरुणास संत जनार्दन स्वामी रुग्णालायत उप्पचारार्थ भरती केले असता त्यांनी दुखापत गंभीर असल्याने त्यास शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात संदर्भाकित करून उपचार्थ रवाना केले होते. तेथे उपचार सुरु असताना त्याचे निधन झाले आहे.दरम्यान या प्रकरणी मयत तरुणांचा फिर्यादी भाऊ बाळासाहेब सावित्रा गांजवे यांनी वरील क्रमांकाच्या पिकअप वरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे यांनी तातडीने भेट दिली आहे.
दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध गु.र.क्रं.२५४/२०२१ भा.द.वि.कलम ३०४,(अ),२७९,३३८,४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४,१४३(अ),१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे हे करीत आहेत.