कोपरगाव तालुका
कर्मवीर सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२१-२२ गळीत हंगामाच्या तयारी करण्याच्या दृष्टीने मिल रोलरचे पूजन नुकतेच कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्यातील सहकारी कारखानदारीतील दुसरा साखर कारखाना कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथे असून त्याचे काळाला अनुसरून अद्यावतीकरण वर्तमानात सूरु असून त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक विश्वासराव आहेर,ज्ञानदेव मांजरे,सुनील शिंदे,मीननाथ बारगळ,बाळासाहेब बाराहाते,सर्जेराव कोकाटे, अशोकराव तीरसे,सचिन रोहमारे,राजेंद्र घुमरे,सचिन चांदगुडे,अरुण चंद्रे,अशोक मुरलीधर काळे,कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे,सेक्रेटरी बी.बी.सय्यद, असि.सेक्रेटरी एस.डी.शिरसाठ विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग ठेवून उपस्थित होते
त्यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”मागील वर्षीच्या गळीत हंगामावर कोरोनाचे सावट असतांना देखील गळीत हंगाम यशस्वी केला आहे. त्याप्रमाणे चालू वर्षीच्या गळीत हंगामावर कोरोनाचे सावट राहू शकते. त्यामुळे ज्याप्रमाणे मागील वर्षी उपाय योजना केल्या त्याप्रमाणे यावर्षी देखील सर्वप्रकारच्या उपाय योजना करून गळीत हंगाम यशस्वी करू. कारखाण्याची गाळप क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने कारखान्याचे पहिल्या टप्प्यातील आधुनुकीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. पुढील वर्षीच्या गाळप हंगामाचा शुभारंभ करतांना तो नवीन मिलचे रोलर पूजनाने केला जाणार आहे.कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षाही जादा दर दिला असून सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची, कामगारांची देणी वेळेत दिली आहे. मागील दोन वर्षापासून पर्जन्यमान समाधानकारक असल्यामुळे ऊसाचे क्षेत्र जरी वाढले असले तरी नोदणी केलेला सर्वच ऊसाचे गाळप करण्यासाठी कारखाना व्यवस्थापन योग्य नियोजन करणार आहे. राज्यामध्ये साखर कारखान्यांचा गाळप हंगाम हा शक्यतो १५ ऑक्टोबर पासून सुरु होईल. त्यावेळी असलेली पर्जन्यमानाची परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.