गुन्हे विषयक
कोपरगावात चोरी करताना रंगेहात पकडला चोर,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात चोरट्यानी कमाल केली असून अलीकडील काळात चोरी झाली नाही असा दिवस सापडणे दुर्मिळ झाले असताना काल रात्रीच्या सुमारास येवला नाका या ठिकाणी बजाज शोरूम समोर फुलझाडे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या इसमाच्या घरात घुसून चोरी करताना खडकी येथील चोरटा पवन रमेश भालेराव याला त्याने रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी फिर्यादी अलोक सुरेंद्र चौधरी (वय-३२) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव शहरातील जुन्या गावठाणातील अनेक ठिकाणी चोरट्यानी आपली लीला दाखवली होती.त्यात कापड बाजारातील राहुल जंगम,हेमंत चव्हाण,किशोर कानडे,सचिन खैरनार,पांडे गल्लीतील श्री पांडे आदींना या चोरट्यांनी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर व त्यांच्या नाकावर टिचून चोरीचा प्रताप करून शहर पोलिसांना आव्हान दिले असतानाच पुन्हा एकदा मयूर कासलीवाल यांची मोठी चोरी उजेडात आली आहे.त्या नंतर आता हि चोरी उघड झाली असून यात विशेष म्हणजे चोरटा रंगेहात पकडला गेला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरात चोरीचे अनेक नमुने उघड होत असून त्याने नागरिक हैराण झाले आहे.या चोऱ्या पोलिसांच्या नाकाखाली सुरु आहे.अशीच घटना साईबाबा चौफुलीनजीक गत सप्ताहात महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्टच्या व्यापारी संकुलातील नाटेगाव येथील व्यापारी रामदास माधव राजूडे यांच्या शटरचे कुलूप लावण्याचे नाक कापून त्या ठिकाणी साडे सात लाखांची चोरी होऊन त्याच्या बातम्या जनतेपर्यंत जाईपर्यंत शहरातील जुन्या गावठाणातील अनेक ठिकाणी चोरट्यानी आपली लीला दाखवली होती.त्यात कापड बाजारातील राहुल जंगम,हेमंत चव्हाण,किशोर कानडे,सचिन खैरनार,पांडे गल्लीतील श्री पांडे आदींना या चोरट्यांनी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर व त्यांच्या नाकावर टिचून चोरीचा प्रताप करून शहर पोलिसांना आव्हान दिले असतानाच पुन्हा एकदा मयूर कासलीवाल यांची मोठी चोरी उजेडात आली आहे.त्या नंतर आता हि चोरी उघड झाली असून यात विशेष म्हणजे चोरटा रंगेहात पकडला गेला आहे.वर्तमानात पावसाळा सुरु असताना फुलझाडे लावण्याचा हंगाम सुरु आहे.त्यामुळे आपल्या व्यवसायानिमित्त फिर्यादी हा अलोक चौधरी हे आपले दुकान शहरातील येवला नाका येथे सुरु केले आहे.त्या ठिकाणी दिवसभर ठेव व्यवसाय करून रात्री त्याच ठिकाणी एक कापडी झोपडी बांधून राहात आहे.रात्री आपली दुकान आवरून ते झोपी गेले असता मध्यरात्रीच्या सुमारास वरील चोरटा पवन भालेराव हा त्या ठिकाणी आला व त्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय तेथे उचकपाचक सुरु केली होती.तेवढ्यात फिर्यादी चौधरी यांना जाग आली असता त्यांनी मोठ्या धाडसाने या चोरट्याला रंगेहात पकडले आहे.व कोपरगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.या प्रकरणी त्यांनी फिर्याद दाखल केली आहे.
कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी आरोपी विरुद्ध गु.र.क्रं.२४२/२०२१ भा.द.वि.कलम ४५७,३८०,५११ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.दत्तात्रय तिकोणे हे करत आहेत.