जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव पालिकेने जागा दिल्यास एकलव्य यांचा पुतळा उभारणार-आश्वासन

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील आदिवासी बांधवांचे प्रेरणास्थान असलेल्या एकलव्य यांचा पुतळा व आदिवासी भवन कोपरगाव नगरपरिषदेने जागा दिल्यास आपण त्यासाठी नक्कीच निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना दिले आहे.

या आदिवासी खावटी अनुदान संचात एक किलो मटकी,दोन किलो चवळी,तीन किलो हरभरा,एक किलो पांढरा वाटाणा, दोन किलो तूरडाळ,एक किलो उडीद डाळ,तीन किलो मीठ,अर्धा किलो गरम मसाला,एक लिटर शेंगदाणा तेल,एक किलो मिरची पावडर,अर्धा किलो चहा पावडर,तीन किलो साखर आदी पदार्थांचा समावेश आहे.या अनुदानाचे आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.

आदिवासी विकास विभाग अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना खावटी अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना अन्नधान्य व किराणा किट वितरण शुभारंभ आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समीतीच्या सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,माजी उपाध्यक्ष कारभारी आगवण, तहसीलदार योगेश चंद्र, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,युवकाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,रोहिदास होन,नगरसेवक मंदार पहाडे,पंचायत समितीचे सदस्य मधुकर टेके,श्रावण आसने,आदिवासी विकास प्रकल्पाचे राजूरचे अधिकारी संतोष ठुबे,मंगेश औताडे,सौ.तांबे मॅडम,आदिवासी संघटनेचे अध्यक्ष मंगेश औताडे लाभार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,भारतातील सर्वात जुने आणि महान असे महाकाव्य म्हणजे महाभारत! याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. महाभारतातील प्रत्येक कथेमध्ये असणारी वेगवेगळ्या प्रकारच्या पात्रांची स्वत:ची अशी एक विशेष ओळख करून दिली आहे.असे असले तरी सुद्धा महाभारतात काही पात्रे अशी आहेत की, ज्यांना विशेष असे महत्व देण्यात आले नाही. यामुळे अशा दुर्लक्षित राहिलेल्या पात्रांना कमी लोक ओळखतात.महाभारतात असणारे असेच एक महान व्यक्तीमत्व म्हणजे एकलव्य हे होय!त्यांचा पुतळा,असणे गरजेचे आहे.त्यासाठी नगरपरिषदेने जागा उपलब्ध करून द्यावी.आदिवासी बांधवांच्या समस्यांची आपल्याला जाणीव आहे.त्यासाठी आगामी काळातही आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन त्यांनी शेवटी दिले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक उपसभापती अर्जुन काळे यांनी केले आहे तर मार्गदर्शन तर उपस्थितांचे आभार आदिवासी संघटनेचे अध्यक्ष मंगेश औताडे यांनी मनले आहे.त्यावेळी उपस्थित नागरिकांना अन्नधान्य वितरण संचाचे वाटप करण्यात आले आहे.

कोपरगाव तालुक्यात एकूण आदिवासी ४५० लाभार्थी आहेत.त्यांना वाटप करण्यात आले आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत हासे, सचिन रामपूरे,आदींनी प्रयत्न केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close