जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
सहकार

..या सहकारी कारखान्याचा ‘आर्थिक शिस्तीबद्दल’ केंद्राकडून गौरव

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याला ऊस उत्पादक शेतकरी,कामगार तसेच इतरही सबंधित घटकांचे सर्व देणी वेळेवर चुकती करून केंद शासनाच्या १ जुलै २०१७ च्या जीएसटी करप्रणालीप्रमाणे सर्व करांची रक्कम केंद्र शासनाला नियमितपण अदा करून सबंधित सर्व रिटर्न वेळेत दाखल केले आहे. केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाकडून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कामाची दखल घेवून कारखान्याच्या आर्थिक शिस्तीबद्दल ‘प्रशस्तीपत्रक’ दिले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी दिली आहे.

“कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याने शासनाची जीएसटीची सर्व देय रक्कम विहित नमुन्यात वेळेत भरून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. त्याबाबत केंद्रीय अर्थमंत्रालयाने कारखान्याच्या आर्थिक शिस्तीची दखल घेवून केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाने सी.बी.आय.सी.चे अध्यक्ष एम.अजितकुमार यांनी प्रशस्तीपत्र देवून कारखान्याच्या आर्थिक नियोजनाचे कौतुक केले आहे”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष,कर्मवीर काळे सहकारी कारखाना.

सहकारी साखर कारखानदारीपुढे अनेक आव्हाने होती आणि आजही आहे. २०१६ ला देखील परिस्थिती वेगळी नव्हती.त्यावेळी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात ऊसाची टंचाई होती.अशा परिस्थितीत आ.आशुतोष काळे यांच्या खांद्यावर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी आली.ऊस उत्पादक शेतकरी,कामगार यांचे नेहमीच हित जोपासत कारखान्याचा अत्यंत जबाबदारीने कारभार करून त्यांनी आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर तीनच वर्षात कारखाना तोटामुक्त करून दाखविला आहे.कारखान्याला संचित नफा मिळवून देत कारखाना व उद्योग समूह प्रगतीच्या शिखराकडे वाटचाल करीत असून सहकारी साखर कारखानदारीचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी दाखवून दिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पूर्ण देणी देवून कामगारांचे मासिक वेतन देखील नियमितपणे सुरु आहे. कारखान्याला कोणत्याही प्रकारची देणी नसून शासनाला विविध कराच्या माध्यमातून देण्यात येणारी राज्य व केंद्र शासनाची देणी देखील मुदतीच्या आत शासनाच्या तिजोरीत जमा केली जात आहे. १ जुलै २०१७ पासून आर्थिक वर्ष २०२१ पर्यंत या चार वर्षात केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने शासनाची जीएसटीची सर्व देय रक्कम विहित नमुन्यात वेळेत भरून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. त्याबाबत केंद्रीय अर्थमंत्रालयाने कारखान्याच्या आर्थिक शिस्तीची दखल घेवून केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाने सी.बी.आय.सी.चे अध्यक्ष एम.अजितकुमार यांनी प्रशस्तीपत्र देवून कारखान्याच्या आर्थिक नियोजनाचे कौतुक केले आहे. केंद्र शासनाच्या अर्थ मंत्रालयाने अशाच प्रकारे ज्या ज्या उद्योग व्यवसायांनी जीएसटी कर वेळेत अदा करून रिटर्न दाखल केला आहे त्यांचे देखील अशा प्रकारे कौतुक केले आहे. कारखान्याच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाचे यापूर्वी देखील अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार व प्रमाणपत्र मिळाले आहेत. त्यामध्ये या प्रशस्तीपत्रकाची भर पडली आहे.

त्याबद्ल कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आ.अशोक काळे व अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी सर्व ऊस उत्पादक शेतकरी,संचालक मंडळ,व्यस्थापन,कामगार यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close